सिंधुदुर्ग today
परिवहन महामंडळा कडून जिल्ह्यातील प्रवाशांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत मनसेने वेधले विभाग नियंत्रकांचे लक्ष.
विभाग नियंत्रक श्री. घुले यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे दिले आश्वासन.
कणकवली प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने कणकवली मनसे शहराध्यक्ष श्री.योगेश कदम नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक श्री. हुले साहेब यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग विभागातील प्रवाशांना उद्भवणाऱ्या समस्या तसेच अधिकारी वर्गांच्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे होणारे नुकसान टाळून काही अंशी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे फायदा व्हावा यासाठी चर्चा केली त्यावर सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक श्री.घुले साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली तालुका सचिव श्री.संतोष कुडाळकर,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली शहराध्यक्ष श्री.योगेश कदम,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली उपतालुका अध्यक्ष श्री.अतुल दळवी व मनसैनिक श्री.श्रीकांत सादये हे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा