सिंधुदुर्ग today


कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  ९ मार्च रोजी महिलांचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन

कणकवली प्रतिनिधी

कास्ट्राईब शिक्षक संघटनेने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवार दि. ९ मार्च २०२५  रोजी महिलांचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन ,डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक ( बार्टी) महाड येथे  आयोजित केले आहे.सदर कार्यक्रमास राज्यातील महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

       या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन मा नामदार श्री.भरतशेठ गोगावले मंत्री , रोजगार हमी योजना,फलोत्पादन आणि खार भूमी , महाराष्ट्र राज्य हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे मा.श्रीमती डॉ वंदना वाहुळ शिक्षण उपसंचालक , शिक्षण संचालनालय पुणे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष : श्री.आकाश तांबे(अध्यक्ष ,कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य)  तर प्रमुख उपस्थिती मध्ये १)श्रीमती अहिल्या कांबळे ( एम ए बी एड सेट ) सोलापूर २)श्रीमती माधुरी तांबे ( एमएससी एम एड, सेट) सिंधुदुर्ग ३)श्रीमती सुषमा मोरे (एम ए बी एड )सातारा ४) श्रीमती संगिता कांबळे ( एम ए बी एड)सांगली ५) श्रीमती वर्षा वाघमारे ( एम ए बी एड) यवतमाळ ६) श्रीमती प्रज्ञा वाघोदे (एम ए बी एड )रत्नागिरी ७)श्रीमती सुप्रिया शिर्के अध्यक्षा बौद्धजन पंचायत समिती ता.महाड ८) श्रीमती बेबीताई जाधव अध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा ता महाड ९) श्रीमती गीतांजली साळवी माध्यमिक शिक्षिका ,कवियत्री ,प्रवचन१०) श्रीमती स्मिता तांबे रायगड जिल्हा महिला विभाग प्रमुख या महिलांचा सहभाग आहे. कास्ट्राईब च्या राज्य अधिवेशनामध्ये राज्यातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार आणि माता रमाई आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.सकाळी १० वा महाड क्रांतिभूमीला अभिवादन! करण्यात येईल.

अधिवेशनामध्ये स्त्री सामाजिक लोकशाहीची नायिका या विषयावर परिसंवाद आहे या परिसंवादात श्रीमती प्रा.गितांजली गंगाधर साळवी (आदर्श शिक्षिका, लेखिका, स्त्री चळवळीच्या अभ्यासक, व्याख्यात्या ) श्री.निलेश पवार ( अभिनेता, डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य,  सामाजिक व सांस्कृतिक अभ्यासक व्याख्याता.) यांचा सहभाग आहे.

तसेच आंबेडकरी चळवळीतील महिलांचा सहभाग या विषयावर खुले चर्चा सत्र आहे. सत्र दोन मध्ये राजमाता जिजाऊ यांच्या पाचाड येथील स्मृती स्थळी अभिवादन!

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याला भेट, महाराजांना मानवंदना आणि अधिवेशनाचा समारोप होईल .कास्ट्राईब या महिला अधिवेशनाला राज्य भरातून जवळपास २ हजार महिला उपस्थित राहणार असल्याचे राज्य अध्यक्ष श्री.आकाश तांबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today