सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील रस्त्यांचे भूमिपूजन.
पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून नागरी सुविधा मधून मंजूर.
कणकवली प्रतिनिधी
नागरी सुविधा मधून नांदगाव हायवे ते रवळनाथ मंदिर जाणारा रस्ता दहा लाख रुपये मंजूर झालेले असून शेटये दुकान ते गुरव घर जाणारा रस्ता दहा लाख रुपये नागरिक सुविधा या दोन रस्त्यांचे आज भूमिपूजन भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कणकवली मतदारसंघाचे लोकप्रिय पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या दोन्ही रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झालेला असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, भाजपा महिला तालुकाध्यक्ष सौ हर्षदा वाळके, माजी सरपंच शशिकांत शेटये, भाजपा मागासवर्गीय सेलचे जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव, भाजप अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष रज्जाक बटवाले, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, शंकर मोरये, शंकर म्हसकर,राजू तांबे, मंगेश बोभाटे , कमलेश पाटील,विजय म्हसकर, बाळा म्हसकर आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा