सिंधुदुर्ग today
परप्रांतीय नोंदणी बाबत ग्रामपंचायतीनी केले सक्तीचे
ग्रा.पं.च्या निर्णयाचे होत आहे स्वागत.
ग्रामीण भागातील गुन्हे कमी होण्यासाठी सरपंचांनी घेतला निर्णय.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
सर्व ठिकाणी परराज्य तसेच परप्रांतीय मोठ्या प्रमाणात येऊन आपला व्यवसाय करीत आहेत यात फेरीवाले ही आहेत व्यवसाय करता करताच त्यांच्याकडून काही गुन्हे घडत असल्याचे सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे. परप्रांतींकडून होणाऱ्या या गुन्हयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आता मोठे पाऊल उचलले दिसत असून गावात येणारे परप्रांतीय, बाहेरील राज्यातील यांनी गावात वास्तव्य करत असताना त्याची नोंदणी सरपंच ग्रामपंचायत तसेच पोलीस पाटील यांच्या येथे करावी अशा आशयाचे बॅनर आता गावोगावी झळकु लागल्याचे सर्वत्र दिसत आहे. या घेतलेल्या ग्रामपंचायतच्या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेतून स्वागत केले जात आहे. परप्रांतीय नोंदणीमुळे काही प्रमाणात तरी होणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसेल अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
ग्रामपंचायत च्या वतीने जाहीर सूचना फलक सर्वत्र लावण्यात आलेले पाहायला मिळत आहे यामध्ये गावात व्यवसाय काम करणाऱ्यांसाठी येणारे परप्रांतीय फेरीवाले ,भाजीवाला ,स्क्रॅप विक्रेते , चिरेखान कामगार यांना सुचित करण्यात येते की गावात येऊन व्यवसाय किंवा काम करण्यापूर्वी संबंधित आणि प्रथम सरपंच ग्रामपंचायत तसेच गावातील पोलीस पाटील यांच्या येथे रीतसर नोंदणी करून परवानगी घेतल्यानंतर गावात व्यवसाय करण्यास व फिरण्यास मुभा राहील अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे गावातील सर्व घरमालकांनी आपल्याकडे राहत असलेल्या भाडोत्री असलेल्या व्यक्तींची माहिती ग्रामपंचायत येथे जमा करावी गावाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सहकार्य करावे असे आवाहनही घर मालकांनाही करण्यात आले आहे. यामुळे या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा