सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे फार्मर आयडी नोंदणी.

राहीलेल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरच नोंदणी करण्यासाठी आवाहन. 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांना फार्मर आयडी नोंदणी करण्यासाठी सुलभ व्हावे याकरिता जोरदारपणे नोंदणी सुरू आहे.

      आज मौजे नांदगाव येथे agristack farmer id काढण्याचा camp ऋषिकेश मोरजकर यांच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंच क्रोशीतील शेतकरी बांधव उपस्थित होते.

      मंडळ कृषी अधिकारी तळेरे अर्जुन जाधव  यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी farmer id काढावा असे आवाहन केले जेणे करून शेतकरी बांधवांना pm किसान , पिक कर्ज, पिक विमा फळपीक विमा , व इतर कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेणे सुकर होईल.

      यावेळी कृषी सहाय्यक सागर चव्हाण , निलेश कावले , रोहन शिंदे , गजानन पवार उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today