सिंधुदुर्ग today
संजय तांबे गुणी विचारी कार्यकर्ता !
गुणी विचारी लेखक!
मधुकर मातोंडकर
.....................
फोंडाघाट येथील संजय तांबे म्हणजे गुणी विचारी कार्यकर्ता गुणी विचारी लेखक. अतिशय अभ्यासूपणे, तळमळीने वैचारिक लेखन करणे हा त्यांचा लेखनाचा गुण विशेष कौतुक करावा असाच आहे. त्याचबरोबर समाजाचे प्रबोधन व्हावं आणि समाज समतेने वागावा हा हेतू ठेवून ते सामाजिक कामही करत असतात. साहित्यिक - सांस्कृतिक कार्यकर्ता म्हणूनही अगदी आपलेपणाने,जिव्हाळ्याने ते कार्यरत असतात.समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या चळवळीला जोडला गेलेला हा गुणी कार्यकर्ता 31 मार्च रोजी निवृत्त होत आहे. यानिमित्ताने संजय तांबे यांना त्यांच्या पुढील निवृत्तीच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!
श्री तांबे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध लेखक म्हणून साहित्य चळवळीत ओळखीचे आहेत. विविधा हे ललित लेखनाचे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर 'समाजभान ' हा त्यांचा वैचारिक ग्रंथ गेल्यावर्षी प्रसिद्ध झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहून विद्रोही चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्या लेखकाचा एवढा उत्तम दुसरा ग्रंथ नाही. ज्येष्ठ विचारवंत अभ्यास डॉ.अशोक पळवेकर यांनी या ग्रंथाला दीर्घ अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. तर ज्येष्ठ कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांनी अभ्यासपूर्ण या ग्रंथाची पाठराखण केली आहे. या दोन मान्यवरांनी या ग्रंथाचे कौतुक केले यातूनच तांबे यांच्या वैचारिक लेखनाची गुणवत्ता सिद्ध होते. मात्र संजय तांबे हे आजवर कोकणच्या परिवर्तन लेखन चळवळीतून दुर्लक्षित राहिले याचं वाईट वाटतं!
संजय शिवाजी तांबे म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. 1984-85 मध्ये ते अभियांत्रिकी शिक्षण उत्तीर्ण झाले.
1986 साली महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्यात त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर नियुक्ती झाली. सेवेची 39 वर्षं पूर्ण होऊन. 31मार्च 2025 रोजीनियतवयोमानानुसार ते सेवानिवृत्त होतं आहेत. या 39 वर्षांच्या कालवधीत कोनालकट्टा (दोडामार्ग तालुका )फोडाघाट, आंबडपाल (कुडाळ तालुका ) येथे कार्यरत राहिले. रायगड, खेड, चिपळूण तालुक्यातही ते कामानिमित्त कार्यरत होते.
सध्या कणकवली येथे खारभूमी विकास उपविभाग येथे कार्यरत असताना ते निवृत्त होत आहेत.त्यांना सामाजिक व सांकृतीक कार्याची आवड. फोँडाघाट बौद्ध विकास मंडळाचे अनेक वर्षं ते अध्यक्ष आहेत. कणकवली महाल बौद्ध विकास संघांचे सदस्य. साहित्य चळवळीत सहभागी.
विविधा नावाचा कथा संग्रह 2022 रोजी प्रसिद्ध. समाजभान नावाचा वैचारिक लेख संग्रह डिसेंबर 2024 मध्ये प्रसिद्ध, सेवेत असताना सामाजिक नाटकांमध्ये सहभागी. विपुल प्रमाणात त्यांनी कविता, आणि वैचारिक लेखन केले.
विविध वृत्तपत्रातून त्यांनी सामाजिक लेखन केले. साप्ताहिक किरात, वैनतेय मधून सतत्त्याने लिखाण केले. आरती, ऋतूपर्ण, अक्षरवैदर्भी मासिकातून लिखाण त्यांचे प्रसिद्ध होत असते.
आनंद यात्री वाड. मय मंडळ वेंगुर्ला,डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे,बॅ. नाथ पै सेवांगण मालवण,
समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, सम्यक संबोधी साहित्य प्रतिष्ठान,सादफौंडेशन, श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी, संविधानिक विचार मंच देवगड आदी महत्त्वाच्या संस्थेची पारितोषिक त्यांना प्राप्त झाली आहे.
संजय तांबे यांना पुढील लेखन वाटचालीसाठी आणि सामाजिक कामासाठी मनापासून शुभेच्छा!
संपर्क / संजय तांबे - 94202 61888

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा