सिंधुदुर्ग today
आरोपी हा कुठल्याही जाती धर्माचा नसतो, तर तो आरोपीच असतो - अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले असलदे येथे हिंदु - मुस्लिम समाज शांतता कमिटी बैठक ; दोन्ही धर्मातील प्रमुखांनी एकोप्याने राहण्यासाठी सुसंवाद ठेण्याची मांडली भुमिका कणकवली दि. ३० मे -ऋषिकेश मोरजकर आपल्या देशात महिला सुरक्षित राहण्यासाठी शासनाचे कडक कायदे आहेत. जर एखाद्या महिलेने आपल्या सुरक्षिततेसाठी फिर्याद नोंदवल्यास त्यावर कारवाई करणे हे पोलिसांचे काम आहे. त्यामुळे आरोपी जर पीडीत महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. दोन्ही समाजातील प्रमुखांनी मांडलेल्या भूमिकेवरून या ठिकाणी एकोप्याने राहणारी माणसे आहेत असे चित्र आहे.कुठल्याही गुन्ह्यातील आरोपी हा आरोपीच असतो तो कुठल्याही जाती धर्माचा नसतो असे मत अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी व्यक्त केले. कणकवली तालुक्यातील असलदे येथील गौरी मंगल कार्यालय येथे हिंदू व मुस्लिम धर्मातील शांतता कमिटीची बैठक श्री. रावले यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव , पोलीस निरिक्षक समशेर तडवी , पोलिस क...