सिंधुदुर्ग today
आमदार नितेश राणे यांनी हरकुळ व हळवल गावातील नुकसानग्रस्त भागाची केली पहाणी
जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देणार
प्रशासनाने केलेले पंचनामे आणि वीज वितरण च्या अहवालानुसार सरकार कडे पाठपुरावा करणार
नुकसान होताच घरांच्या छताचे पत्रे, कौले पाठवून दिल्या बद्दल ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांचे मानले आभार
कणकवली : प्रतिनिधी
कणकवलीत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला होता. यामुळे कणकवली तालुक्यातील हरकुळ बु. व हळवल येथे घरांचे मोठे नुकसान झाले होते.कणकवली - देवगड - वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांनी हरकुळ व हळवल येथे वादळी वाऱ्यात नुकसानग्रस्त कुटुंबांची l भेट घेतली व नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पहाणी केली. नुकसान होताच फोन वरून माहिती घेवून घरांच्या छताचे पत्रे, कौले व इतर साहित्य आमदार नितेश राणे यांनी तातडीने पाठवून दिल्या बद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. शासनाची मदत येईपर्यंत वाट पाहायला लागली नाही. आमदार नितेश राणे यांच्या मदतीमुळे कोसळलेली घरांचे छत त्वरित दुरुस्त करून घेता आले अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी येथील ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांनी तातडीने केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी सभापती बुलंद पटेल, बाबा वर्देकर,माजी उप सरपंच राजू पेडणेकर,चंद्रकांत परब,इम्रान शेख,अनिल खोचरे,आबा खोचरे, बडेमिया शेख,गणेश घाडीगावकर,प्रमोद घाडीगावकर,समद शेख, सईद शेखयांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.तर तहसिलदार दीक्षांत देशपांडे,वीज वितरण चे कार्यकारी अभियंता मोहिते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. हरकुळ शेखवाडी आणि खडकवाडी येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या सर्व नुकसानीची आमदार नितेश राणे यांनी आधिकऱ्यांसोबत पाहाणी केली.
यावेळी आ. नितेश राणे म्हणाले, तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे जे काही नुकसान झालेलं त्याचे प्रशासन व वीज महावितरण विभागाच्या माध्यमातून जे काही पंचनामे केले. त्या सर्व नुकसानाचा आढावा घेतला. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही तातडीची मदत उपलब्ध करून दिली आहे. प्रामुख्याने तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी जे काही सहकाऱ्यांसमवेत कार्यप्रणाली राबवून पंचनामे केले. त्याप्रमाणे नुकसान भरपाईची जी काही मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारकडे केलेली आहे. त्याचा पाठपुरावा करून पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून इकडे झालेलं नुकसान स्पेशल केस म्हणून जास्तीत जास्त नुकसान भरपाई जास्तीत जास्त लोकांना कशी मिळवून देता येईल यासाठी याकरिता आम्ही पाऊले टाकणार आहोत, असेही ते म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा