सिंधुदुर्ग today



नांदगाव येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर जिओ नेटवर्क  गायब 

ग्राहक हैराण 

कणकवली ( प्रतिनिधी) 

कणकवली तालुक्यातील नांदगाव हे मुंबई गोवा महामार्गावर दुतर्फा वसलेल्या गावात मोबाईल नेटवर्क वारंवार गायब होते आणि ते ही विद्युत पुरवठा खंडीत झाला की मोबाईल कव्हरेज क्षेत्राबाहेर लागतो यामुळे नांदगाव विभागात जीओ ग्राहक हैराण झाले आहेत.

 नांदगाव येथे सुरुवातीला बी.एस.एन.एल ‌.व एअरटेल अशी नेटवर्क असायची यातील बी.एस.एन.एल नेटवर्क असेच गायब होत असल्याने काही वर्षांपूर्वी जीओ कंपनी ने 

मोबाईल टॉवर उभारून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला.व लोकांनी सिमकार्ड पोर्ट करुन अथवा नव्याने जीओ नेटवर्क साठी रुपांतर केले. आता तर गेल्या दोन महिन्यांपासून नांदगाव परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला की जीओ मोबाईल नेटवर्क गायब होते. यामुळे ग्राहक हैराण झाले असून दुसऱ्या नेटवर्क च्या शोध घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today