सिंधुदुर्ग today




नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील बंद पथदिवे दुरुस्ती करण्यास सुरुवात 

ऋषिकेश मोरजकर यांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील अर्धे नादुरुस्त पथदिवे आज अखेर दुरुस्ती करण्यास केसीसी कंपनीने सुरुवात केली असल्याने नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश मोरजकर यांनी यासंदर्भात पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील अर्धे पथ दिवे बंदच असून याबाबत हायवे प्राधिकरण यांचेकडे वारंवार सुचना करुन ही कंपनी कडून दखल घेतली नसल्याने नांदगाव येथील श्री ऋषिकेश मोरजकर यांनी आठ दिवसांत सुरळीतप न केल्यास सोमवार दिनांक २० मे रोजी याच ब्रिज खाली ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा हायवे प्राधिकरण ला लेखी स्वरूपात दिला होता .  

         या आंदोलनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता श्री अतुल शिवनिवार यांनी सदर बंद स्थितीत असलेले पथदिवे येत्या ४ ते ५ दिवसांत सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन  ऋषिकेश मोरजकर यांना दिले होते . या अनुषंगाने ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. 

    उंच पथ दिवे असल्याने क्रेन च्या साहाय्याने सदर पथदिवे दुरुस्ती करणार असल्याने क्रेन नादुरुस्त होती आता क्रेन दुरुस्ती करून आज सकाळपासून केसीसी कंपनीने नादुरुस्त पथदिवे क्रेन च्या सहाय्याने दुरुस्ती करण्यास सुरुवात केली असल्याने आंदोलन पुकारलेल्या ऋषिकेश मोरजकर यांनी व सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच उर्वरित पेडिंग कामे ही लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today