सिंधुदुर्ग today



पहिल्याच पावसात वीज वितरण कंपनीचा उडाला बोजवारा 

नांदगाव येथे वारंवार विज पुरवठा होतो खंडीत 

नळ पाणी पुरवठ्यासाठी होतेय दमछाक 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव विभागातील वीजपुरवठा पहिल्याच पावसात वारंवार खंडित होऊ लागला आहे याचा विपरीत परिणाम ग्रामपंचायतच्या नळ पाणीपुरवठ्यावर होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

      अजून खरा पावसाळा सुरू झालेला नसतानाच वळीवाच्या पावसातच वीज वितरण कंपनीचा पूर्णता बोजवारा उडाल्याचे पहावयास मिळत आहे. नांदगाव परिसरात आज मध्यरात्री ही बरेच  तास वीज पुरवठा खंडित होता त्यानंतर काही वेळ चालू झाल्यानंतर पुन्हा वीजपुरवठा खंडित झालेला आहे खंडित झालेला वीजपुरवठा बर्याच तासानंतर  सुरू झाल्याने नागरिक हैराण झालेले आहेत. आधीच उष्णतेमुळे हैराण झालेले नागरिक वीज पुरवठा खंडित मुळे अनियमित्त पाणीपुरवठा यामुळे नागरिक हैराण झालेले दिसत आहेत.विद्युत अभियंता नांदगाव यांचा मोबाईल बंद कणकवली विद्युत अभियंता फोन स्वीकारत नाहीत यामुळे स्थानिक प्रशासन तसेच ग्रामस्थांनी काय करावे?

      दरम्यान नांदगाव येथील शिष्टमंडळाची उद्या कणकवली येथील विज वितरण कंपनीच्या अभियंता यांना याबाबत जाब विचारण्यासाठी जाणार असल्याचे नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today