सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील श्री देव कोळंबा जत्रोत्सव ५ मे रोजी.
तयारी अंतिम टप्प्यात.
७०० ते ८०० किलो भाकरीचे पीठ नांदगाव पंचक्रोशीत वाटप.
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे हाकेला धावणारा आणि नवसाला पावणाऱ्या अशी ख्याती असलेल्या श्री देव कोळंबा देवाची जत्रा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली आहे .रविवार दिनांक 5 मे 2024 रोजी हा श्री देव कोळंबाचा वार्षिक जत्रोत्सव होत आहे.
यानिमित्त कार्यक्रम सकाळी 8ते 9 पूजा विधि ,9 ते 2 मागील नवसाची फेड करणे ,12 ते 4 नविन नवस बोलणे व 4 ते रात्री 8 पर्यंत महाप्रसाद होणार आहे.
या जत्रोत्सवाला विशेष म्हणजे कोंबडा व बकरा देण्याची प्रथा आहे आणि याचे सर्वांना सायंकाळी चार नंतर मटन व भाकरी असा महाप्रसाद सर्व भक्तांना दिला जातो. हजारो भाविकांच्या या महाप्रसादासाठी लागणारी भाकरीची व्यवस्था जवळपास 700 ते 800 किलो भाकरीच्या पिठाची श्रीदेव कळंबा उत्कर्ष मंडळाच्या वतीने व्यवस्था केली असून याचे नांदगाव पंचक्रोशीत आजूबाजूच्या गावातही घरोघरी भाकरीचे पीठ वाटप केले जाते आणि श्रद्धेने जनता घरोघरी भाकऱ्या भाजून प्रसाद सुरू होण्याअगोदर जत्रोस्तवाच्या ठिकाणी मंडळाकडे जमा करतात. या जत्रोस्तवासाठी अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भावी येत असतात नांदगाव येथे मुंबई गोवा महामार्गावर दुथर्फा लांबच्या लांबच रांगा भाविकांच्या लागलेले असतात विशेष म्हणजे
ही जत्रा दरवर्षी नांदगाव येथील आठवडा बाजारा दिवशीच रविवार होत असल्याने नांदगाव पूर्ण परिसर भक्ती भवानी फुलून निघणार हे मात्र नक्की.
जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात.
या संस्थेच्या कळंबाच्या त्रस्तवासाठी मंडळातर्फे गेल्या पंधरा दिवसापासून तयारी सुरू असून आता मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे कोल्हापूर येथील मंडप डेकोरेटर चे व्यवस्थेचे काम सुरू आहे.
तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा