सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे दुपारी १ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान
अजून ही मतदारांच्या रांगा
नांदगाव तिठा येथे ही बंदोबस्त तैनात
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव म्हणजे राजकीय केंद्र बिंदू मानला जातोय या मतदानाच्या मतदान केंद्रावर सकाळी 10 नंतर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांचा मिळून प्रचंड गर्दी मतदान केंद्राबाहेर पाहायला मिळाली दुपारी 1 वाजेपर्यंत
एकूण २६०८ पैकी १२२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामुळे सरासरी १ वाजेपर्यंत ४६ टक्के नांदगाव येथे मतदान झाले असून अजूनही लांबच लांब रांगा मतदारांच्या लागलेल्या आहेत.
या संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची जादा कुमक येऊन या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले व सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. यावेळी अतिरिक्त पोलिस फौजफाटा मध्ये पोलिस psi हाडळ, पोलिस कानस्टेबल जाधव , पोलीस हवालदार चव्हाण,इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच नांदगाव तिठा मुख्य चौकात दोन मोठ्या पोलीस तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा