सिंधुदुर्ग today



आरोपी हा कुठल्याही जाती धर्माचा नसतो, तर तो आरोपीच असतो - अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले

असलदे येथे हिंदु - मुस्लिम समाज शांतता कमिटी बैठक ; दोन्ही धर्मातील प्रमुखांनी एकोप्याने राहण्यासाठी सुसंवाद ठेण्याची मांडली भुमिका

कणकवली दि. ३० मे -ऋषिकेश मोरजकर 

आपल्या देशात महिला सुरक्षित राहण्यासाठी शासनाचे कडक कायदे आहेत. जर एखाद्या महिलेने आपल्या सुरक्षिततेसाठी फिर्याद नोंदवल्यास त्यावर कारवाई करणे हे पोलिसांचे काम आहे. त्यामुळे आरोपी जर पीडीत महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. दोन्ही समाजातील प्रमुखांनी मांडलेल्या भूमिकेवरून या ठिकाणी एकोप्याने राहणारी माणसे आहेत असे चित्र आहे.कुठल्याही गुन्ह्यातील आरोपी हा आरोपीच असतो तो कुठल्याही जाती धर्माचा नसतो असे मत अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले  यांनी व्यक्त केले. 




कणकवली तालुक्यातील असलदे येथील गौरी मंगल कार्यालय येथे हिंदू व मुस्लिम धर्मातील  शांतता कमिटीची बैठक श्री. रावले यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव , पोलीस निरिक्षक समशेर तडवी , पोलिस किरण मेथे , चंद्रकांत झोरे, मंगेश बावदाने आदी उपस्थित होते . या बैठकीला असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर,असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके ,  नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर,उपसरपंच सचिन परब,कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर,तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर,व्हाइस चेअरमन अतुल सदडेकर, दयानंद हडकर,दिलीप फोंडके,दाजी सदडेकर,सुभाष बिडये, संजय पाताडे , प्रदीप हरमलकर, तात्या निकम,हेमंत कांडर,पप्पी सापळे,निलेश तळेकर,नांदगाव तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे, नामदेव वाडकर,देवेंद्र हडकर ,रघुनाथ लोके,मुस्लिम समाज अध्यक्ष  अहमद बटवाले(पटेल), दर्गा समिती अध्यक्ष शकील बटवाले , रज्जाक बटवाले, उमर नावलेकर, शहाबुद्दीन साठविलकर , माजी सैनिक गवस साठविलकर , अल्लाउद्दीन बोबडे ,जाफर कुणकेरकर आदींसह नांदगांव दशक्रोशीतील हिंदू बांधव व नांदगांव येथील मुस्लिम बांधव उपस्थित होते.
 
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले म्हणाले, स्त्रियांसाठी सुरक्षा महत्त्वाची आहे, आम्ही खाकी वर्दी घातली की नागरिकांना सुरक्षा देणे हे आमचे कर्तव्य आहे. तो हक्क कोणीही काढू शकत नाही. या परिसरात घडलेल्या प्रकाराबाबत समाजातील दोन्ही घटकांनी जागृत होण्याची गरज आहे. आपल्या मुलांवर पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे . मुलांना सांगा काय बरोबर आहे ? काय चूक आहे ?  या गोष्टी त्यांना पटवून देण्यासाठी प्रयत्न करा. महिलांसाठी सुरक्षा महत्त्वाची आहे, आरोपीला जात धर्म नसतो . त्यामुळे जी कारवाई आहे. ती कारवाई केली जाईल त्याला कुठल्याही समाजातील घटकाने पाठीशी घालु नये अशा सुचना केल्या. कुणालाही तक्रार करावयाची असल्यास आमच्या कार्यालयाचे दरवाजे आपल्यासाठी केव्हाही खुले आहेत. आपण आम्हाला कळवल्यास दखल घेतली जाईल , असा विश्वास त्यांनी दिला. 
     पोलीस निरीक्षक समशेर तडवी म्हणाले , दोन्ही समाजातील पदाधिकारी , नागरिकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. दोन्ही समाजांनी कुठल्याही गोष्टीत जातीय तेढ निर्माण होणार नाही असेही सांगितले. त्यामुळे आम्ही हिंदू मुस्लिम  एकोप्याने राहतील. गुन्हेगारावर कारवाई होईल त्याबद्दल कोणीही मनात शंका ठेवू नये. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. दोन्ही समाजातील शांतता बैठक शंभर टक्के यशस्वी झाली असेही त्यांनी सांगितले. 
या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले , कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव , पोलीस निरिक्षक समशेर तडवी यांचा पुष्पगुच्छ देवून दोन्ही समाजातील प्रमुखांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी दोन्ही समाजातील प्रमुखांनी शांतता प्रमुखांच्या बैठकीत आपापले मुद्दे मांडले. त्यानंतर जे झालेले प्रकार आहेत , त्याबाबत दोन्ही समाजाची कमिटी गटीत करुन त्यावर चर्चा करुन संवादाने मार्ग काढण्यात येतील. असे ठरवण्यात आले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today