सिंधुदुर्ग today
उद्या पासून फोंडाघाट येथे संयुक्त जयंती महोत्सव
अजय कांडर, डॉ.शमिता बिरमोळे, प्रमिता तांबे यांची व्याख्याने
कणकवली/प्रतिनिधी
फ़ोडाघाट येथे बुधवार २२ ते गुरुवार २३ मे या दोन दिवशीय कालावधी मध्ये भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात नामवंत कवी अजय कांडर यांचे 'बाबासाहेब समजून घेताना' आणि लेखिका प्रमिता तांबे यांचे 'बाबासाहेबांचे महिलांविषयी कार्य' तर डॉ.शमिता बिरमोळे यांचे 'स्रियांचे आजार व त्याबाबत घ्यावयाची काळ्जी' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
फ़ोडाघाट बौध्द विकास मंडळ, मुंबई व गावशाखा तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फ़ोडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने फ़ोडाघाट येथील नालंदा बुद्ध विहारात सदर दोन दिवशीय जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात 22 मे रोजी स. 10 वा. डॉ. शामिता बिरमोळे यांचे 'स्रियांचे आजार व त्याबाबत घ्यावयाची काळ्जी यावर व्याख्यान होईल. याच दरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी १ या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून फ़ोडाघाट प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव व त्यांचे सहकारी रुग्णांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करणार आहेत.संध्याकाळी स्रियांचे व मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
23 मे रोजी सकाळी ध्वजारोहण, धम्मपूजापाठ या कार्यक्रमानंतर 10.30 वा.कवी अजय कांडर यांचे 'बाबासाहेब समजून घेताना' या विषयावर व्याख्यान होईल.तर त्यानंतर लेखिका प्रमिता तांबे यांचे 'बाबासाहेबांचे महिलांविषयी कार्य' या विषयावर व्याख्यान होईल. रात्री 9.30 नंतर संस्कृतीक कार्यक्रम, मान्यवरांचे मार्गदर्शक व बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला आहे. तरी वरील दोन दिवसीय कार्यक्रमांस आंबेडकर प्रेमीनी उपस्थिती रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा