सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे चुरशीने 74 टक्के मतदान.
२६०८ पैकी १९३४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
ग्रामपंचायत निवडणुक तुलनेत ६५ मतांची वाढ
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव म्हणजे राजकीय केंद्र बिंदू मानल्या जाणाऱ्या या मतदानाच्या तिनं केंद्र मिळून एकूण २६०८ पैकी १९३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत १८६८ मतदान झाले होते आता ६५ मतांची वाढ झाली असून एकूण १९३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
नांदगाव बुथ क्रमांक २२४ मध्ये ५२९ , २२५ मध्ये ७१५ तर २२६ मध्ये ६९० असे एकूण १९३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
सायंकाळी मतदान संपताना पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी व पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
या संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची जादा कुमक येऊन या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले व सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. यावेळी अतिरिक्त पोलिस फौजफाटा मध्ये पोलिस psi हाडळ, पोलिस कानस्टेबल जाधव , पोलीस हवालदार चव्हाण,इतर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा