सिंधुदुर्ग today
नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील बंद पथदिवे संदर्भातील उद्याचे आंदोलन तात्पुरते स्थगित.
उप अभियंता श्री अतुल शिवनिवार यांनी ५ दिवसांत सुरळीत करण्याचे दिले लेखी आश्वासन
ऋषिकेश मोरजकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा
कणकवली (प्रतिनिधी)
कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील पथदिवे अर्धे बंदच असून याबाबत हायवे प्राधिकरण यांचेकडे वारंवार सुचना करुन ही कंपनी कडून दखल घेतली नसल्याने नांदगाव येथील श्री ऋषिकेश मोरजकर यांनी उद्या सोमवार दिनांक २० मे रोजी याच ब्रिज खाली ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा हायवे प्राधिकरण ला लेखी स्वरूपात दिला होता . दरम्यान या आंदोलनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री अतुल शिवनिवार यांनी सदर बंद स्थितीत असलेले पथदिवे येत्या ४ ते ५ दिवसांत सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश मोरजकर यांना दिले असल्याने ऋषिकेश मोरजकर यांनी उद्याचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. मात्र दिलेल्या आश्वासनानुसार कार्यवाही न झाल्यास आंदोलन पुकारले जाईल व त्यावेळेस माघार घेतली जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.
दिलेल्या आश्वासनामध्ये उप अभियंता श्री अतुल शिवनिवार असे सांगितले आहे की,उंच पथ दिवे असल्याने क्रेन च्या साहाय्याने सदर पथदिवे दुरुस्ती करणार असल्याने क्रेन नादुरुस्त असल्याने क्रेन दुरुस्ती चे काम सुरू असून दोन दिवसांत क्रेन दुरुस्ती होवून बंद स्थितीत असलेले पथदिवे येत्या 4 दिवसांत सुरळीतपणे करण्याचे हायवे प्राधिकरणाने मेंटनस कंपनी केसीसी ला तात्काळ निर्देश दिले आहेत. व याबाबत नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश मोरजकर यांना लेखी स्वरूपात आश्वासन देत सदर समस्या चार दिवसांत सुरळीतपणे होईल आपण पुकारलेले उद्याचे आंदोलन स्थगित करण्यात यावे अशी विनंती केली आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रांताधिकारी कणकवली, तहसिलदार कणकवली, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे कणकवली तसेच केसीसी.क़ंपनी यांना प्रती पाठविण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा