सिंधुदुर्ग today



देवगड निपाणी महामार्गावर असलदे डामरेवाडी दरम्यान कार व आराम बस अपघात. 

एक जखमी 

नांदगाव प्रतिनिधी 

देवगड निपाणी महामार्गावर कणकवली तालुक्यातील असलदे डामरे वाडी वळणावर आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास खाजगी आराम बस व कार यांच्यात अपघात झाला या अपघातात कारमधील प्रवासी जखमी झाली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी की, देवगड हुन मुंबई च्या दिशेने जाणारी खाजगी आराम बस तर सांगली हुन देवगड कडे जाणारी कार यांच्यात अपघात होवून या अपघातात कार मधील एक जखमी झाले असून जखमींना नरेंद्र महाराज यांच्या रुग्णवाहिकेतून पांडू तेली यांनी कणकवली येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today