सिंधुदुर्ग Today न्यूज
मनसेच मराठी फलक संदर्भात खळखट्याक होणार? मनसे विद्यार्थी सेनेचे कणकवली पोलिस निरीक्षक यांना निवेदन. कणकवली/ प्रतिनिधी मनविसे चे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नीलेश मेस्त्री, उपजिल्हा अध्यक्ष अनिकेत तर्फे यांचा कणकवली हूमरठ येथील असणाऱ्या बी. ऐन. विजयकार इंग्लिश स्कूल चे नाम फलक मराठी मध्ये करावे अशी मागणी निवेदनाद्वारे यापूर्वी केली होती. तसेच शासनाचा जीआर ही मराठी फलक संदर्भात आहे. त्यावेळी त्यांना १५ दिवसांची मुदत देवून सदर नाम फलक मराठी मध्ये करावे अशी मागणी केली होती. इंग्लिश स्कूल च इंग्रजीत असलेलं B.N. Vijaynkar हे नाव अद्याप ही मराठीत केले नसल्याने मनसे विद्यार्थी सेनेचे आंदोलन अथवा खळखट्याक झाल्यास सर्वस्वी जबाबदार शाळा व्यवस्थापन समिती राहणार असल्याचे निवेदन कणकवली पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.