सिंधुदुर्ग Today न्यूज
मुलांनी शालेय जीवनापासून अभ्यासाबरोबरच कौशल्यही जपली पाहिजेत - कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई चे कुलगुरू डॉ.जयवंत शेलार.
नांदगाव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नांदगाव : ऋषिकेश मोरजकर
दहावी व बारावीत आज कोकण अव्वल आहे.आज मुलांची गुणांची टक्केवारी वाढली आहे.मात्र आजच्या काळात गुणांपेक्षा आपल्या अंगी असणारे कौशल्यही तितकेच महत्वाचे आहे.यासाठी मुलांनी शालेय जीवनापासून अभ्यासाबरोबरच कौशल्यही जपली पाहिजेत भविष्यात हीच आपल्याला वेगळी दिशा देऊ शकते असे प्रतिपादन I T M कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई चे कुलगुरु डॉ. जयवंत शेलार सर यानी केले.
श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ, नांदगांव, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था व सरस्वती हायस्कूल नांदगाव याच्या संयुक्त विद्यमाने गुणवंतांचा सत्कार सोहळ्यात सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे ते विद्यार्थांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी डाॅ. शेलार यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती मूर्तीला पुष्पहार अर्पण स्वागतगीत व ईश्वस्तवन सादर करीत सुरवात करण्यात आली.
यावेळी श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ अध्यक्ष नागेश मोरये,उपाध्यक्ष अकुंश डामरे, खजिनदार सुभाष बिडये,सरपंच रविराज मोरजकर, नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष गजानन रेवडेकर, ग्रा.पं.सदस्य मारूती मोरये,मुख्याध्यापक एस.बी.तांबे याच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे शेलार म्हणाले की,नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेमार्फत कौशल्य प्रधान कोर्स सुरू करावेत. यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असून मुलांना शिष्यवृत्ती देऊ अशी ग्वाही देत मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले. तर नागेश मोरये म्हणाले, आजवर आपण मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक योजना राबवल्या. त्यातून अनेक मुलांनी प्रेरणा घेत उच्च पदावर पोहचले यातच आपण समाधानी असून असे कार्यक्रम कायम राबवणा.
दरम्यान गजानन रेवडेकर,सुभाष बिडये,रविराज मोरजकर यानी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हातील एस.एस.सी. परिक्षेत पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व सरस्वती हायस्कूल नांदगाव मधील पहील्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर तांबे व सूत्रसंचालन संजय सावंत यानी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा