सिंधुदुर्ग Today न्यूज
नांदगाव परिसरामध्ये चक्रीवादळाचा तडाखा
देवगड निपाणी मार्गावर तोंडवली येथे वटवृक्ष कोसळला : वाहतूक ठप्प
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
देवगड निपाणी राज्य मार्गावर वटवृक्ष उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे.अजूनपर्यंत वटवृक्ष बाजूला करण्यास संबंधित विभागाचे कर्मचारी आले नसल्याने वाहणांची दुतर्फा रांग लागली आहे.हि घटना सकाळी १०:३० च्या सुमारास घडली.
देवगड निपाणी मार्गावर जुनाट असलेला हा वटवृक्ष मोडकळीस आला होता.याबाबत लगतच्या मालकांनी संबंधित विभागाला माहीती देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले.मात्र दैव बलवत्तर म्हणून शालेय विद्यार्थी व पालक यावेळी तिथून जात असताना ही घटना घडली आणि काही फुटाचे अंतर असतानाच वृक्ष कोसळला.मात्र कोणत्याही प्रकारची इजा कुणाला झाली नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा