सिंधुदुर्ग Today न्यूज

 


नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दत्ता तपसे यांचा तडकाफडकी राजीनामा ?

राजीनाम्याचे कारण काय वाचा सविस्तर.

ऋषिकेश मोरजकर | नांदगाव


कणकवली तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे यांनी आज तडकाफडकी राजीनामा जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग यांना इ मेल व्दारे पाठवले आहे.

       तर याची प्रत संचनालय सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई, उपसंचालक कोल्हापूर परिमंडळ व तालुका आरोग्य अधिकारी कणकवली यांना ही प्रति पाठविल्या आहे.

       डॉ.दत्ता तपसे यांनी लेखी दिलेल्या राजीनामा पत्रात असे म्हटले आहे की ,या नांदगाव येथे  मागील 20 महिन्यापासून मी 24 तास मुख्यालयात राहून सेवा देत आहे मला रक्तदाब मधुमेह हृदयाचा आजार आहे तरीसुद्धा कोणतेही कारण न देता मी एकटा वैद्यकीय अधिकारी 24 तास मनःपूर्वक सेवा करण्यासाठी आरोग्य सेवा देत आहे .शासन स्तरावरून राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदी बंद पत्रित वैद्यकीय अधिकारी देत आहेत . तरीपण आपण जाणीवपूर्वक या आस्थापणे वर आपल्या स्तरावरी नांदगाव येथील रिक्त पद दाखवले नसल्याने मला बंद पत्रित वैद्यकीय अधिकारी किंवा कंत्राटी वैद्यकीय अधिकारी दिला जात नाही मला जाणून-बुजून त्रास दिल्याचे निदर्शनास येत आहे यामुळे माझे मानसिक आरोग्य तसेच शारीरिक आरोग्य बिघडत आहे आपल्या दिनांक 26 /6/ 2023 च्या पत्रानुसार मला प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडा व प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे येथील अतिरिक्त पदभार दिलेला आहे त्यामुळे ही माझी वारंवार तब्येत बिघडत आहे मी वैद्यकीय अधिकारी गट या पदाचा राजीनामा देत आहे तरी मी उद्यापासून ओपीडीला नसणार आहे तीन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर अनुचित प्रकार घडला तर मी त्याला जिम्मेदार नसणार आहे तरी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब यांनी माझा राजीनामा तात्काळ मंजूर करण्यात यावा असे या शेवटी पत्रात नमूद केलेले आहे.

      डॉ तपसे हे महाराष्ट्र चे डॉ संघटनेचे अध्यक्ष आहेत.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today