सिंधुदुर्ग Today न्यूज

 


बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी विलास कांडर तर कार्यवाहपदी समीर मयेकर.

बावशी गावच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या प्रतिष्ठानची स्थापना.

कणकवली/प्रतिनिधी

      बावशी गावचा सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बावशी सामाजिक-सांस्कृतिक-

शैक्षणिक प्रतिष्ठानची स्थापना नव्याने करण्यात आली आहे. सदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विलास कांडर तर कार्यवाहपदी गावचे पोलीस पाटील समीर मयेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

      कणकवली तालुक्यातील बावशी गाव हा विकासाच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेला गाव म्हणून ओळखला जातो. भौगोलिक दृष्ट्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाची लोकसंख्या अगदी 400 ते 500 असली तरी या गावाचा सर्वांगीण विकास अद्याप झालेला नाही. या पार्श्वभूमीवर बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानची स्थापना नव्याने करण्यात आली आहे.

   मंगळवार 18 जुलै रोजी गावात प्रतिष्ठान स्थापन करण्यासंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी सदर प्रतिष्ठानची पुढील प्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली. अध्यक्ष - विलास कांडर, उपाध्यक्ष - मोहन खडपे, कार्यवाह - समीर मयेकर, सहकार्यवाह - संजय राणे, कोषाध्यक्ष - शिवराम गुरव,सदस्य - दीपक मर्ये .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today