सिंधुदुर्ग Today न्यूज

 नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ तपसे यांचा तडकाफडकी राजीनाम्याचे वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ

आज पदाधिकारी ग्रामस्थ एकत्र येण्याची शक्यता

डॉ तपसे यांना नांदगाव येथून जावू देणार नाही - सरपंच भाई मोरजकर

नांदगाव | ऋषिकेश मोरजकर

कणकवली तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वप्रथम सिंधुदुर्ग Today या न्यूज चॅनलने प्रसिद्ध करताच नांदगाव परिसरामध्ये खळबळ उडाली असून काही तासातच ही बातमी जवळपास 3000 वाचकांनी वाचली असल्याचे त्या बातमीलतील व्ह्यू वरुन लक्षात येत आहे. दरम्यान नांदगाव येथील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ नागरिक आज नांदगाव येथील आरोग्य केंद्रात एकत्र येण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत  नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी डॉ तपसे यांना नांदगाव येथून जावू देणार नसल्याचे सांगत याबाबत वरिष्ठ पातळीवर लक्ष वेधले असल्याचे सांगितले आहे.
राजीनामेची सत्यता पडताळणी करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र येणार असल्याचे समजत आहे.
    *डॉ तपसे यांना नांदगाव येथून जावू देणार नाही - सरपंच भाई मोरजकर*
नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ तपसे  डॉक्टर पेशा पेक्षा पलीकडे जाऊन माणुसकीच्या भावनेतून सामाजिक उपक्रम राबवत आहेत त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारे रुग्णांना सेवा देत आहेत त्यामुळे नांदगाव केंद्रातून त्यांना जाऊ देणार नाही याबाबत वरिष्ठ पातळीवर आम्ही दूरध्वनीद्वारे चर्चा करून आमदार नितेश राणे यांचे याबाबत लक्ष वेधले आहे अशी प्रतिक्रिया नांदगाव सरपंच रवीराज उर्फ भाई मोरजकर  यांनी सिंधुदुर्ग Today न्यूज शी बोलताना दिली आहे.
      वृध्दाश्रम येथे प्रत्यक्ष जाऊन तसेच कणकवली पोलीस ठाण्यात रुग्ण सेवा बजावली आहे.यामुळे नांदगाव येथील त्यांचे काम समाधानकारक असल्याचेही म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today