सिंधुदुर्ग Today न्यूज

 


किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नांदगाव येथील आवश्यक कुटुंबांना पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

किशोर मोरजकर यांच्या 10 व्या स्मृतिदिनी ट्रस्ट चा अभिनव उपक्रमाची घोषणा

 कणकवली /(प्रतिनिधी) :  

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नांदगाव येथील आवश्यक कुटुंबांना पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून किशोर मोरजकर यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट ने  हा अभिनव उपक्रम जाहीर केला आहे.     

ट्रस्टची निर्मिती करताना ज्यांच्या नावाने ट्रस्ट सुरू केला आहे ते कै. किशोर मोरजकर भजनी बुवा कलाकार होते. त्यांनी 2009 मध्ये शासनाच्यावतीने मिळणाऱ्या वृध्द कलाकार मानधनसाठी प्रस्ताव केला होता. मात्र, तो प्रस्ताव प्रलंबितच राहीला आणि त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांना 1 वर्ष पूर्ण होत असताना त्यांना सदरची पेन्शन मंजूर करण्यात आल्याबाबत पत्र आले. पण, ते मंजूर मानधन त्यांच्या पत्नी अगोदर निधन झाल्याने मंजूर मानधन मागे पाठवावे लागले होते. त्याचवेळी किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट ची निर्मिती करताना ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी जाहीर केले होते की, अशी वेळ पुन्हा कुठल्याही निराधार पेन्शन, कलाकार मानधन मिळण्यासाठी येवू नये म्हणून नांदगाव येथील ज्या गरजू लोकांना पेन्शन, कलाकार मानधन प्रस्ताव करून योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टने पाऊल उचलले आहे. जनतेला कुठल्याही प्रकारे हेलपाटे न करता कमीत कमी वेळात सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी सांगितले आहे.

       यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर ट्रस्ट चे उपाध्यक्ष भाई मोरये, सचिव निकेत पावसकर ,मारुती मोरये,दिपक मोरजकर, तोसीम नावलेकर आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today