सिंधुदुर्ग Today न्यूज

 


संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त 14 जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली |ऋषिकेश मोरजकर

शिवसेना नेते तथा कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक 14 जुलै रोजी विविध बरगच्च समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्त सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ सकाळी 7 वा. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृह येथे भव्य रक्तदान शिबिर होणार आहे.

        तसेच भगवती मंगल कार्यालय येथे सकाळी 10.30 वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व भेटवस्तू दिल्या जाणार आहेत, कणकवली शहरातील महिला बचत गटांना छत्र्या वाटप, दिव्यांग यांना भेटवस्तू दिल्या जाणार आहेत ,रक्तदात्यांना छत्री भेटवस्तू दिल्या जाणार आहेत 

      या कार्यक्रमाला शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत ,शिवसेना नेते तथा माजी मंत्री भास्कर जाधव ,आमदार वैभव नाईक ,जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर ,शिवसेनेचे नेते अतुल रावराणे, सतीश सावंत, संजय पडते, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख शैलेश परब ,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालम, जानवी सावंत ,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक ,मंदार शिरसाट, कणकवली तालुका प्रमुख शैलेश भोगले, डॉ.प्रथमेश सावंत ,देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जयश नर , वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके नंदू शिंदे,  कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, दोडामार्ग तालुका अध्यक्ष संजय गवस, बाबुराव धुरी, वेंगुर्ले तालुकाप्रमुख बाळू परब, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, यांच्यासह जिल्हा पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती पंचायत समिती सदस्य माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत . तरी या कार्यक्रमांना शिवसैनिक व संदेश प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today