सिंधुदुर्ग Today न्यूज
ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जदारांनी एकरकमी परतफेड ५०% व्याज सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन .
सिंधुदुर्ग Today न्यूज
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ व शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळ (ओबीसी महामंडळ) यांचेमार्फत कर्ज घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थींसाठी महामंडळाकडून एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेनुसार महामंडळाकडून घेतलेल्या मुदती कर्ज ,बीज भांडवल कर्ज , स्वर्णिमा कर्ज , मार्जिनि मनी कर्ज, या सर्व योजनांतर्गत असलेल्या थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेत 50% सवलत देण्यात येत आहे.
तरी संबधित सर्व कर्ज खातेधारकांना कळविण्यात येते की सदर योजना माहे मार्च २०२४ पर्यंत असून या योजनेचा जास्तीत जास्त कर्जदारांनी लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करावी व आपले कर्ज खाते बंद करावे असे जिल्हा व्यवस्थापक यांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय सिंधुदूर्ग येथे 02362-228119 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा तसेच जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा