सिंधुदुर्ग Today न्यूज
नांदगाव गाव स्तरीय अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे वितरण वृषाली मोरजकर,लक्ष्मी पाटील यांना पुरस्कार जाहिर कणकवली / प्रतिनिधी नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्या प्रमाणे गाव स्तरीय अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023 हा सौ.वृषाली ऋषिकेश मोरजकर व सौ.लक्ष्मी विश्वनाथ पाटील यांना जाहिर झाला असून या पुरस्काराचे पुरस्कार वितरण सोहळा नांदगाव ग्रामपंचायत येथे नुकतेच संपन्न झाले . पुरस्कारामध्ये शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह रोख रक्कम चा समावेश आहे. यावेळी नांदगाव सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर, ग्राम विकास अधिकारी मंगेश राणे, ग्रामपंचायत सदस्या रमिजान बटवाले, पूजा सावंत, गौरी परब, जैबा नावलेकर, अनिकेत तांबे, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, तोसीम नावलेकर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर गावातील असंख्य महिला वर्ग उपस्थित होते. आज महाराष्ट्रात सर्वत्र एकाच दिवशी या पुरस्कार चे प्रत्येक गावातील दोन महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. ...