सिंधुदुर्ग Today न्यूज
नांदगाव म्हटलं की शासकीय निधीच्या पुढे जाऊन मदत करतो : आमदार नितेश राणे
नांदगाव पावाचीवाडी येथील विविध धार्मिक कार्यक्रम निमित्ताने दिली भेट.
नांदगाव ( ऋषिकेश मोरजकर)
नांदगाव म्हटलं की शासकीय निधीच्या पुढे जाऊन मदत करतो असे आमदार नितेश राणे यांनी सांगत राणेंच्या सुरुवातीच्या काळापासूनच नांदगाव गावचे ऋणानुबंध आहे. आपण जसे धार्मिक कार्यक्रमांना एकत्र येतात तशीच एकजूट विकासासाठी करुन नांदगाव गाव सुजलाम सुफलाम करुयात यासाठी आमच्या विचारांचे सरपंच, उपसरपंच तसेच संपूर्ण तरुण टिम विकास सेवेसाठी नांदगाव ग्रामपंचायत येथे कार्यरत असल्याचे आमदार नितेश राणेंनी शेवटी सांगितले आहे.
कणकवली तालुक्यातील नांदगाव पावाची वाडी येथील महापुरुष क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहन व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आमदार नितेश राणे यांनी उपस्थित राहून श्री चे दर्शन घेतले. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर उपसरपंच इरफान साटविलकर, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर,माजी पंचायत समिती सदस्या सौ हर्षदा वाळके, हनुमंत वाळके, संतोष वाळके,पुणाजी चव्हाण,दिपक चव्हाण, विश्वनाथ चव्हाण, भागोजी चव्हाण आदी भाजप पदाधिकारी,मंदिर विस्वस्थ, ग्रा. पं.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा