सिंधुदुर्ग Today न्यूज
ओटव धरणाजवळील पावणादेवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात.
काल सोहळ्याला मधमाशांचा झाला होता हल्ला.
सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा
नांदगाव : ऋषिकेश मोरजकर
कणकवली तालुक्यातील ओटव गाव येथील धरणाजवळील पावणादेवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान होम हवन सुरू असताना मधमाशांच्या हल्यात बरेच भाविक जखमी झाले होते.
आता जखमी भाविक पूर्ण बरे झाले असल्याने आज पुन्हा एकदा सुरळीत ओटव गाव येथील धरणाजवळील पावणादेवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली असून सुरळीत धार्मिक कार्यक्रम सुरू असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान या हल्ल्यात अनेकांच्या शरीरावर मधमाशांनी चावा केल्यानंतर त्यांना काल मधमाशांच्या हल्यात बरेच भाविक जखमी झाले असल्याने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.यात उपचार घेतलेले ३० जण जखमी होते.तर यातील ४ जण गंभीर होते . आता सर्वजण सुखरूप असून सर्वांना कालच घरी सोडण्यात आले असल्याने आज पुन्हा एकदा सुरळीत ओटव गाव येथील धरणाजवळील पावणादेवी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली असून सुरळीत धार्मिक कार्यक्रम सुरू असल्याचे सांगितले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा