सिंधुदुर्ग Today न्यूज

 


पावसाळ्याच्या सुरुवातीला दिविजा वृद्धाश्रमात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार


नांदगाव / प्रतिनिधी

आज 28 मे रोजी असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशन अंतर्गत असणाऱ्या दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांची मोफत आरोग्य तपासणी करून मोफत गोळ्या औषधोपचार देण्यात आले आहे . वृद्धाश्रमात 46 आजी आजोबा आहेत त्यापैकी 38 आजी आजोबांची रक्तदाब, मधुमेह डोळे, त्वचा व सर्वसाधारण तपासणी नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ तपसे यांनी केली. गंभीर आजार असणाऱ्या आजी आजोबांना प्रा आ केंद्रात उपचार करण्यात येतील असेही डॉ तपसे यांनी सांगितले आहे.

पावसाळ्यात होणाऱ्या आजारावर मार्गदर्शन करण्यात आले, वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी डॉ दत्ता तपसे यांचे आभार व्यक्त केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today