सिंधुदुर्ग Today न्यूज



 नांदगाव येथील भक्तांच्या हाकेला धावणारा जागृत देवस्थान श्री देव कोळंबा जत्रा उद्या.

भक्तांच्या स्वागतासाठी कोळंबा नगरी सज्ज. 

सिंधुदुर्ग Today न्यूज: ऋषिकेश मोरजकर 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणारा, भक्तांच्या हाकेला धावणारा श्री देव कळंबा देवाची जत्रोत्सव उद्या रविवार दिनांक 7 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे.

        जत्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मंडप व विद्युत रोषणाई ने नांदगाव कोळंबा नगरी परीसर सजवले गेले आहे. सर्व भक्तांच्या स्वागतासाठी कोळंबा परीसर सज्ज होत आहे.

     नांदगाव परीसरातील जवळपास असलेल्या गावातील घरोघरी भाकरीचे पीठ दिले जाते.यासाठी जवळपास 700 किलो भाकरी चे पिठ तयार करून घरोघरी वाटप केले आहे. बरेच भक्त गण स्वतः हून मंडळाकडून पिठ घेऊन जात श्रध्देने भाकरी भाजून देतात.

        सकाळी ठीक 8 वाजल्यापासून पुजा झाल्यावर जत्रेला सुरुवात केली जाते.यानंतर 9 ते दुपारी 12 पर्यंत मागील वर्षी बोललेल्या नवसाची फेड केली जाते. 12 पासून नविन नवस बोलले जातात तर सायंकाळी ठीक 4 वाजल्यापासून भक्त गण दर्शनासाठी व महाप्रसादासाठी रांगा लावल्या जातात.येणार्या सर्व भक्तांना मटण भाकरी प्रसाद म्हणून दिला जातो.महीला व पुरुष मंडळी साठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. दर्शनासाठी मुंबई गोवा महामार्गावरील दुतर्फा लांबलचक रांगा लावल्या जातात.

       तरी भाविकांनी या जत्रेला उपस्थित राहून दर्शन व महा प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today