सिंधुदुर्ग Today न्यूज

 


नांदगाव सर्व्हिस रस्ता 

उद्यापासून वाहतुकीस खुला होणार; नांदगाव सरपंच भाई मोरजकर 

नांदगाव प्रतिनिधी 

मुबंई गोवा महामार्ग नांदगाव येथील सर्व्हिस रस्ता अखेर वाहतुकीस उद्या पासून खुला करण्यात येणार आहे.नागरिक व वाहन चालकांची गेले चार वर्षांपासूनची प्रतीक्षा होती.ती प्रतीक्षा पुर्णत्वात जाताना दिसत आहे. हा सर्व्हिस रस्ता होण्यासाठी अनेक राजकीय पक्षाने उपोषण व आंदोलने केली गेली होती.या सर्व्हिस रस्त्याचा मार्ग मोकळा होण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले.वारंवार राजकीय अनेक पक्षांची आंदोलन केली गेली होती . त्याची दखल आमदार नितेश राणे यांनी घेऊन प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न केले. आणि या प्रयत्नांला यश आलेले पाहायला मिळतंय.तसेच सर्व्हिस रस्ता नसल्यामुळे अनेकांना अपघातामध्ये जीव गमवावा लागला आहे . उद्यापासून नागरिक व वाहन चालकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.अशी माहिती  नांदगांव गावचे सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर यांनी दिली आहे .



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today