सिंधुदुर्ग Today न्यूज

 


नांदगाव  गाव स्तरीय अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे वितरण 

वृषाली मोरजकर,लक्ष्मी पाटील यांना पुरस्कार जाहिर

कणकवली / प्रतिनिधी 

नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्या प्रमाणे गाव स्तरीय अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023 हा सौ.वृषाली ऋषिकेश मोरजकर व सौ.लक्ष्मी विश्वनाथ पाटील यांना जाहिर झाला असून या पुरस्काराचे पुरस्कार वितरण सोहळा नांदगाव ग्रामपंचायत येथे नुकतेच संपन्न झाले .

 पुरस्कारामध्ये शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह रोख रक्कम चा समावेश आहे. 

        यावेळी नांदगाव सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर, ग्राम विकास अधिकारी मंगेश राणे, ग्रामपंचायत सदस्या रमिजान बटवाले, पूजा सावंत, गौरी परब, जैबा नावलेकर, अनिकेत तांबे, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, तोसीम नावलेकर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर गावातील असंख्य महिला वर्ग उपस्थित होते.

        आज महाराष्ट्रात सर्वत्र एकाच दिवशी या पुरस्कार चे प्रत्येक गावातील दोन महिलांचा सन्मान करण्यात आला आहे.

        नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना महिलांनी अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसेच आज गावातील दोन महिलांचा सन्मान होत आहे त्यांचा ही आदर्श ठेवावा असे सांगून खरोखरच या दोन्ही निवडलेल्या पुरस्कारासाठी महीला यात लक्ष्मी पाटील व वृषाली मोरजकर यांनी इमाने इतबारे काम केले आहे.यामुळे जी निवड प्रक्रिया झाली ती योग्यच म्हणावी लागेल असेही शेवटी सरपंच भाई मोरजकर यांनी म्हटले आहे.

     यावेळी पुरस्कार विजेत्या सौ.वृषाली मोरजकर यांनी आपण 8 ते 10 वर्ष अविरतपणे महीला सक्षमीकरण करण्यासाठी विविध प्रशिक्षणे व मोफत प्रशिक्षण तसेच मोफत शिलाई मशीन लाभ मिळून दिले असून यामुळे हा पुरस्कार मला मिळाल्याने  मी करत असलेल्या कामांची पोच पावती मिळाली असल्याचे सांगितले आहे. 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार ग्रामविकास अधिकारी मंगेश राणे यांनी मानले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today