पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंच्या प्रचारार्थ उद्या कासार्डे जि.प.गटातील असलदेत होणार प्रचार सभा. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, आमदार नितेश राणेंची उपस्थित राहणार  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)  केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंच्या प्रचारार्थ उद्या बुधवार दिनांक 1 मे रोजी सकाळी ठीक 10.30 वा. महायुतीची कासार्डे जिल्हा परिषद गटातील प्रचार सभा गौरी मंगल कार्यालय असलदे येथे आयोजित करण्यात आली आहे.यावेळी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, आमदार नितेश राणे,व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.कासार्डे जिल्हा परिषद गटात नारायणराव राणेंच्या प्रचार सभेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे.        तरी कासार्डे जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मिलिंद मेस्त्री,हर्षदा वाळके, संजय देसाई, पंढरी वायंगणकर, भाई मोरजकर यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
मुख्यमंत्री होण्या आदी ठाकरे चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कधीही गेले ते दाखवा. भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांचा घणाघात ठाकरेंना महापौर बंगल्यावर तासंतास बसण्यास वेळ होता कणकवली |प्रतिनिधी  मुख्यमंत्री होण्या अगोदरचा चैत्यभूमीवर अभिवादन करतानाचा उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांचा एक तरी फोटो दाखवावा.हाकेच्या अंतरावर असलेल्या महापौर बंगल्यावर तासंतास बसण्यास वेळ होता. पण कधी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होऊन अभिवादन करायला वेळ मिळाला नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय तिथे गेले. अन्यथा ते कधीही गेले नाहीत.याचे कारण देखील त्यांनी सांगावे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काय विचार आहेत.? हे सुध्दा जाहीर करावे. अन्यथा आम्हाला पुराव्यासकट तोंड घडल्यास फारच मागत पडेल. अशी टीका भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली.   संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ब...

सिंधुदुर्ग today

इमेज
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी मुस्लिम समाज प्रचारात सक्रिय हुमरठ,साकेडी येथील मुस्लिम समाज पुढे सरसावला  राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा बैठकांचा धडाका सुरू कणकवली; प्रतिनिधी  राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यातील गाव हुमरठ व  साकेडी येथे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार  ना. नारायण राणे  प्रचारार्थ बैठका घेतल्या. यावेळी उमेदवार नारायण राणे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा शब्द दिला. यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर,कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, हुमरठ माजी उपसरपंच मुश्ताक काझी, सईद काझी, वासिम शेमना व ग्रामस्थ उपस्थित होते. तर साकेडी येथे सुद्धा  मुस्लिम समाज बांधवांनी नारायण राणे यांना विजयी करण्याचा निर्धार केला यावेळी उपसरपंच जहुर शेख, अकबर शेख, अझहर शेख, दिलदार शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
  ...जोपर्यंत शिरवल मध्ये जाण्यासाठी रस्ता डांबरीकरण करुन मिळत नाही,* तोपर्यंत कुठल्याही राजकीय  पक्षांनी प्रचारासाठी येऊ नये...! ग्रामस्थांनी केला निर्धार; बॅनर मधून वेधले लक्ष! शिरवल गावच्या प्रवेशद्वारावर प्रचारासाठी प्रवेश बंदीचा लावण्यात आला फलक. कणकवली (प्रतिनिधी) कणकवली तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेला शिरवल गावातील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. ३० वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला हा रस्ता आता मात्र शेवटच्या घटका मोजत आहे. रस्त्याचे काम सुरू होईल या भाबड्या आशेवर मात्र शिरवल ग्रामस्थ प्रतीक्षेत आहेत. रस्त्याचे डांबरीकरणाचे  काम मंजूर असुन निविदा काढण्यात आली आहे.कार्यारंभ आदेश मिळून सुद्धा एप्रिल महिना संपत आला तरी शिरवल गावच्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात होत नसल्याने शिरवल ग्रामस्थांनी बॅनरच्या माध्यमातून सर्व पक्षीयांचा तीव्र  शब्दात निषेध व्यक्त केला आहे. जोपर्यंत शिरवल मध्ये जाण्यासाठी रस्ता डांबरीकरण करुन मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी बॅनरच्या माध्यमातू...

सिंधुदुर्ग today

इमेज
फोंडाघाट विभागातील येथील उबाठा गटाचे असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश  कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील फोंडा विभागातील येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते दीपक लाड, अशोक लाड, सत्यवान रावराणे, ओमकार लाड, सुधीर लाड, सदानंद लाड, भगवान गोसावी, प्रतीक लाड, विनायक गोसावी, प्रणय लाड, यश लाड, दत्तगुरु गुरव, भाऊ लाड, यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून फोंडा गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करताना सांगितले. यावेळी मनोज राव राणे, राजन चिके, मामा हळदीवे, संजय आग्रे, संतोष कानडे, सुरेश सामंत, सुजाता हळदिवे, संजना आग्रे आदि भाजप उपस्थित होते..

सिंधुदुर्ग today

इमेज
लोरे नं.२ येथील उबाठा गटाचे ग्रा.पं. सदस्य विजय मांडवकर यांच्यासह युवासेना अमोल गोरुले यांनी केला भाजपात प्रवेश. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील लोरे नं२  येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते विजय मांडवकर व अमोल गोरुले यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून लोरे गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करताना सांगितले. यावेळी दिलीप राव राणे, बंटी राव राणे आदि भाजप उपस्थित होते..

सिंधुदुर्ग today

इमेज
वैभववाडी लोरे नं.2  उ.बा.ठा च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश आमदार नितेश राणे यांच्या लोरे गावातील  विकास कामांचा धडाका पाहून पक्षप्रवेश कणकवली : वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.2 मधील युवा कार्यकर्ते मंदार रावराणे,तेजस रावराणे , वैभव रावराणे, संजय रावराणे, महादेव रावराणे, रुपेश रावराणे, स्वागत रावराणे, प्रणय रावराणे, अक्षय रावराणे, सचिन रावराणे,अभय रावराणे,सुधाकर रावराणे, अमित रावराणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील लोरे नं 2 गावातीलठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांच्या सोबत भाजप पदाधिकारी दिलीप रावराणे, रितेश सुतार, पदाधिकारी उपस्थित होते.