पोस्ट्स

सिंधुदुर्ग today

इमेज
विश्व हिंदू परिषद - बजरंग दल कोकण प्रांत शिवशौर्य यात्रा उद्या नांदगावात नांदगाव विभागातून उस्फुर्त पणे सहभागी होण्याचे आवाहन   शिवराज्याभिषेक ३५० वर्ष      कणकवली प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वर्ष असून या निमित्ताने विश्व हिंदू परिषद - बजरंग दल कोकण प्रांत च्या वतीने शिवशौर्य यात्रेला आज दोडामार्ग पासून सुरुवात झाली असून उद्या रविवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी दुपारी ठिक १२ वा. नांदगाव तिठा येथे शिवशौर्य यात्रेचे दर्शन घेण्यासाठी आगमन होणार आहे.व येथून पुढे मार्गस्थ होईल व कासार्डे येथे १ वा. आगमन होणार आहे तरी नांदगाव विभागातून उस्फुर्त पणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
मुंबई एकता कल्चर अकादमीच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रियदर्शनी पारकर प्रथम तर योगिता शेटकर द्वितीय. डिसेंबर मध्ये गिरगाव येथे साहित्य संघात पारितोषिक वितरण. कणकवली/प्रतिनिधी           मुंबई एकता कल्चर अकादमी या प्रतिष्ठित संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या खुल्या काव्य स्पर्धेत महाराष्ट्र आणि परदेशातून सुमारे दोनशे कवींनी सहभाग घेतला. यात फोंडाघाट येथील कवयित्री प्रा प्रियदर्शनी पारकर यांनी प्रथम तर सावंतवाडी येथील कवयित्री योगिता शेटकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.अशी माहिती एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष कवी प्रकाश जाधव यांनी दिली असून या दोघी कवयित्रींचे या यशाबद्दल सिंधुदुर्ग साहित्य चळवळीतून अभिनंदन करण्यात येत आहे.      एकता कल्चर अकादमीतर्फे नव्या कवींना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी खुली काव्य स्पर्धा गेली 30 वर्ष आयोजित केली जात आहे. या प्रतिष्ठित अशा काव्य स्पर्धेत यावर्षी सुमारे दोनशे कवींनी सहभाग घेतला. यात महाराष्ट्र बरोबर परदेशातील मराठी कवींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या स्पर्धेत फोंडाघाट येथील कवयित्री प्रा.प्रियदर्शनी पारकर यांना 'ते त...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी कमिटीचे केले कौतुक. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) नांदगाव तिठा येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही ईद ए मिलादुननबी जलसा मुबारक निमित्ताने आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केरण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर ,उपसरपंच इरफान साटविलकर ,सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले, ग्रामपंचायत सदस्या रमिजान बटवाले , यासिर मास्के, शाहिद बटवाले ,जुबेर मास्के, तैयब बटवाले ,यासिन नावलेकर ,गफार बटवाले ,तन्वीर साटविलकर ,पोलिस किरण मेथे, आदि मान्यवर उपस्थित होते.   यावेळी यादव साहेब यांनी ईद मुबारक निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व आशिकाने मुस्तुफा शिरत कमेटी चे कौतुक केले व रक्तदान हे सर्वांत महत्त्वाचे दान आहे जसे आपण अवयव दान करतो व अडीअडचणीला धावून जातो तेव्हा असे समाज उपयोगी काम महत्वाचे आहे. हा कार्यक्रम आणखी मोठा होवो व अश्या कार्यक्रमाला म...

सिंधुदुर्ग today

इमेज
    ................................. 'सिंधुदुर्ग टुडे'  या माध्यमातून गुणवंत शिक्षकांवर प्रकाश झोत टाकणारी मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेतील आजच्या मानकरी आहेत नांदगाव प्राथमिक शाळा एक मधील गुणवंत शिक्षिका प्रतिमा पोकळे! ....................................... विद्यार्थ्यांमध्ये संगीताची कला जोपासणाऱ्या अष्टकलापटू शिक्षिका प्रतिमा पोकळे.     🏵️  गुरू माझी माऊली  🏵️ सिंधुदुर्ग / ऋषिकेश मोरजकर    जीवन हे विविध कलानी भरलेलं असतं. मात्र त्याची जाणीव विद्यार्थी दशतच व्हायला हवी. अशी जाणीव झाली की शिक्षणाबरोबरच माणसाचा भविष्यात सर्वांगीण विकास घडतो आणि ते व्यक्तिमत्व लोकांसमोर येते. विद्यार्थ्यांमधील कला विकासाची अशी जाणीव करून देणाऱ्या आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड जोपासणाऱ्या ज्याला आपण अष्टकलापटू म्हणू शकतो अशा गुणवंत शिक्षिका प्रतिमा पोकळे! सध्या त्या नांदगाव प्राथमिक शाळा एक येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असून आजवर त्यांची ज्या ज्या शाळेत नेमणूक झाली त्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठीच त्या...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगावात ईद ए मिलाद उत्साहात. नांदगाव |(ऋषिकेश मोरजकर) नांदगाव येथे मोठ्या उत्साहात ईद  ए मिलादुननबी जलसा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला    या वेळी सर्व मुस्लिम बांधवांनी सकाळी ८ वाजता नांदगाव तिठा व खालची मुस्लिम बांधव गोसिया मस्जिद येथून आपल्या मोहलयातून रॅली काढली व या रॅलीत त्यांनी ईद ए मिलादुननबी जलसा मुबारक, नारे तकबिर आलोहो अकबर,नारे रिसालत या रसुलुला अश्या घोषणा दिल्या या वेळी प्रत्येक मोहलयातून घराघरात मिठाई शिरखुरमा सामोसे, लाडू, सरबत पाणी आदी वस्तू ईद मुबारक निमित्ताने वाटण्यात आले या रॅलीत सर्व मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.   यावेळी सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील कासार्डे पोलीस दुरक्षेत्र पोलीस झोरे, वाहतूक पोलीस आबिटकर, पोलिस शिंदे , आदी उपस्थित होते. ईद ए मिलादुननबी जलसा मुबारक निमित्ताने सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील व वाहतूक पोलीस आबिटकर यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला . या वेळी मनोज पाटील यांनी ईद मुबारक निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व मुस्लिम -हिंदू बांधवांना नियाज (प्रसाद ) वाटण्यात आला.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे ठीक ठिकाणी गणपती बाप्पा चे भक्तीमय वातावरणात विसर्जन. विसर्जनाला देवा तुझ्या रे डोळे भरतात पाण्यामध्ये नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज अनंत चतुर्दशी निमित्त गणपती बाप्पाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले आहे.गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती... पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात फटक्यांच्या आतषबाजी करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. नांदगाव वरची वाडी येथील पाटील वाडी गणेश कोंड गणपती साना,पावाची वाडी नदीकाठी, मधली वाडी, वाघाची वाडी, गोसावी, कुंभार वाडी ,पाटवणे वाडी अशा ठिक ठिकाणी गणपती बाप्पाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  प्रसाद लोके खून प्रकरणी शिवसेना आक्रमक. आम्ही जनतेच्या बाजूने, तपास सीआयडीकडे द्या -संदेश पारकर कणकवली प्रतिनिधी  मिठबाव येथील प्रसाद लोके याचा निर्घृण खून आणि त्याची पत्नी मनवा लोके हिची आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी स्थानिक जनतेची आग्रही मागणी आहे. त्यासाठी मिठबाव ग्रामस्थांनी मोर्चा काढला आहे. शिवसेना स्थानिक जनतेच्या भावनांशी सहमत आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी शिवसेनेचीही मागणी आहे, आणि ती पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे.  गेल्या वर्षभरात पोलीस यंत्रणा कमालीची अकार्यक्षम झाली आहे. शिवसेना या संदर्भात सातत्याने आवाज उठवीत आहे. स्थानिक पोलीस योग्य पद्धतीने काम करीत नाहीत. सध्या गृहखाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांची या खात्यावरील पकड ढिली झाली आहे, हे भाजपच्या माजी आमदार यांनी मोर्चात सहभागी होत सिद्ध केले आहे. प्रसाद लोके प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या कारभारावर भाजपच्याच स्थानिक आमदारांनी प्र...