पोस्ट्स

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  नांदगाव  गाव स्तरीय अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे वितरण  वृषाली मोरजकर,लक्ष्मी पाटील यांना पुरस्कार जाहिर कणकवली / प्रतिनिधी  नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्या प्रमाणे गाव स्तरीय अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023 हा सौ.वृषाली ऋषिकेश मोरजकर व सौ.लक्ष्मी विश्वनाथ पाटील यांना जाहिर झाला असून या पुरस्काराचे पुरस्कार वितरण सोहळा नांदगाव ग्रामपंचायत येथे नुकतेच संपन्न झाले .  पुरस्कारामध्ये शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह रोख रक्कम चा समावेश आहे.          यावेळी नांदगाव सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर, ग्राम विकास अधिकारी मंगेश राणे, ग्रामपंचायत सदस्या रमिजान बटवाले, पूजा सावंत, गौरी परब, जैबा नावलेकर, अनिकेत तांबे, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, तोसीम नावलेकर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर गावातील असंख्य महिला वर्ग उपस्थित होते.         आज महाराष्ट्रात सर्वत्र एकाच दिवशी या पुरस्कार चे प्रत्येक गावातील दोन महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. ...

सिंधुदुर्ग Today न्यूज

  नांदगाव  गाव स्तरीय अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्कार जाहीर. वृषाली मोरजकर,लक्ष्मी पाटील यांना जाहिर. कणकवली/प्रतिनिधी  नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाने जाहीर केल्या प्रमाणे गाव स्तरीय अहिल्या देवी होळकर महिला सन्मान पुरस्कार 2023 हा सौ.वृषाली ऋषिकेश मोरजकर व सौ.लक्ष्मी विश्वनाथ पाटील यांना जाहिर झाला असून याचे वितरण आज सायंकाळी  4 वा.नांदगाव ग्रामपंचायत येथे होणार आहे.         आज महाराष्ट्रात सर्वत्र एकाच दिवशी या पुरस्कार चे प्रत्येक गावातील दोन महिलांचा सन्मान होणार आहे.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  पावसाळ्याच्या सुरुवातीला दिविजा वृद्धाश्रमात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार नांदगाव / प्रतिनिधी आज 28 मे रोजी असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशन अंतर्गत असणाऱ्या दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांची मोफत आरोग्य तपासणी करून मोफत गोळ्या औषधोपचार देण्यात आले आहे . वृद्धाश्रमात 46 आजी आजोबा आहेत त्यापैकी 38 आजी आजोबांची रक्तदाब, मधुमेह डोळे, त्वचा व सर्वसाधारण तपासणी नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ तपसे यांनी केली. गंभीर आजार असणाऱ्या आजी आजोबांना प्रा आ केंद्रात उपचार करण्यात येतील असेही डॉ तपसे यांनी सांगितले आहे. पावसाळ्यात होणाऱ्या आजारावर मार्गदर्शन करण्यात आले, वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी डॉ दत्ता तपसे यांचे आभार व्यक्त केले आहे.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  नांदगाव विभागात विजेचा खेळ खंडोबा आज रविवार असूनही आठ ते दहा वेळा विज गायब नळ पाणी योजनेवर ही परिणाम * कणकवली/प्रतिनिधी* नांदगाव विभागात विजेचा खेळ खंडोबा आज रविवार असून ही सकाळी ते आता दुपारी 3 पर्यंत  आठ ते दहा वेळा विज गायब झाली असून वारंवार होणाऱ्या या विज पुरवठा खंडित मुळे नागरिक व व्यापारी वर्ग वैतागून गेले असून नळपाणी पुरवठा योजनेवर ही परिणाम होत आहे . याबाबत संपर्क साधला असता फोन उचलला जात नाही तरी यावर उपाय योजना न केल्यास सदर कार्यलयात धडक दिली जाईल असा इशारा ग्राहक नागरिकांतून केला जात आहे.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  कासार्डे ज्युनिअर कॉलेज चा 100 टक्के निकाल नांदगाव ची दिक्षिता लाड ही कासार्डे कला शाखेत कॉलेज मध्ये प्रथम नांदगाव (प्रतिनिधी) आज  १२ वी परीक्षा निकाल जाहीर झाला असून कासार्डे ज्युनिअर कॉलेज चा 100 टक्के निकाल लागला आहे.या कासार्डे कॉलेज मधून कला शाखेतील नांदगाव ची दिक्षिता संजय लाड हीने  प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे.या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले जात आहे.

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
 ' नानायात्रा' ग्रंथात गाव परिवर्तनाचा इतिहास 'नानायात्रा' ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन  सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती कणकवली/प्रतिनिधी      गावच्या परिवर्तनासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते.गोविंद तथा नाना चव्हाण यांनी साठ वर्षांपूर्वी गाव परिवर्तनाचा ध्यास घेतल्यामुळेच त्यांच्या स्मृती ग्रंथरूपात जतन करण्याचा हा सोहळा येथे घडू शकला. त्यांच्या कार्याचा कोकणातील प्रत्येक गावाने आदर्श घेण्याची गरज असून 'नानायात्रा' ग्रंथात गाव परिवर्तनाचा इतिहास असल्याचे प्रतिपादन नामवंत कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर यांनी किर्लोस येथे केले.     ज्येष्ठ संगीत अभ्यासक माधव गावकर यांनी असगणी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते नाना चव्हाण यांचे चरित्र लेखन शब्दबद्ध व संपादन केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन कवी कांडर यांच्या हस्ते किर्लोस विजयालक्ष्मी सभागृहात झाले. मुंबई केळकर कॉलेजचे माजी विभाग प्रमुख तथा भाषा अभ्यासक प्रा.डॉ.प्रकाश परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मंचावर नाना चव्हाण यांचे सुपुत्र माजी विशेष न्याय...

सिंधुदुर्ग Today न्यूज

इमेज
  पियाळी येथे रस्त्याचे भूमिपूजन आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून रस्ता मंजूर नांदगाव/प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील पियाळी करमळकर वाडी ते जैन मंदिर व वंजारे वाडी येथील गणेश घाट रस्ता डांबरीकरण करणे या रस्त्याचे काम  आमदार नितेश  राणे  यांच्या माध्यमातून तसेच कणकवली माजी सभापती संतोष कानडे यांच्या पाठपुरावामुळे निधी मंजूर झाला असून या कामाच्या भूमी पूजन वेळी सरपंच बंड्या पन्हाळकर, उपसरपंच संजय ढवन, ग्रामपंचायत सदस्य विजय मुरकर, बूथ अध्यक्ष बाबू घाडी, रवी करमळकर, दत्ताराम गवळी, गांधी बाबु, तुषार गुरव, राजेंद्र पवार, पोलीस पाटील सुनील पवार, गणेश पेडणेकर, लक्ष्मण पवार, सखाराम गवळी, आधी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.