पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
गार्गी आणि इतर एकांकिका पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य - कवी अजय कांडर नाटककार उदय जाधव लिखित ग्रंथाचे मुंबई रवींद्र नाट्य मंदिर मध्ये प्रकाशन  अभिनेत्री मेघा घाडगे, केतकी नारायण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती. कणकवली/ प्रतिनिधी      कोकण सुपुत्र नाटककार उदय जाधव लिखित "गार्गी आणि इतर एकांकिका" या नाट्य पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य असून  उदय जाधव हे आपल्या मूळ परंपरेचा शोध घेणारे सशक्त असे मराठी रंगभूमीवरचे आजचे महत्वाचे नाटककार आहेत असे प्रतिपादन नावांत कवी तथा नाटककार अजय कांडर यांनी केले.         बोधिवृक्ष फाऊंडेशन निर्मित उदय जाधव लिखित, दिग्दर्शित "देवानंपिय असोक" या नाटकाचा २५ वा रौप्यमहोत्सवी प्रयोग सोहळा कवी अजय कांडर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना मेघा घाडगे यांच्या उपस्थिती मुंबई प्रभादेवी रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला.या निमित्ताने कोकण सुपुत्र या नाटकाचे लेखक - दिग्दर्शक उदय जाधव लिखित "गार्गी आणि इतर एकांकिका" या नाट्य पुस्तकाचे प्रकाशन कवी कांडर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमु...

सिंधुदुर्ग today

इमेज
मोजणीला विरोध केल्याप्रकरणी उमेश वाळकेसह दोघे निर्दोष. अँड उमेश सावंत यांनी पाहिले काम. कणकवली / प्रतिनिधी कणकवली नगरपंचायतीच्या स्टेडिअमसाठीच्या आरक्षण नं. ५६ ची मोजणी करत असताना भूमि अभिलेखचे निमतानदार यांना मोजणीला विरोध केला. तसेच टेबल लावू न देता सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जमिन मालक माजी नगरसेवक उमेश सहदेव वाळके व सोहम उमेश वाळके यांची ओरोस येथील अतिरीक्त सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अँड उमेश सावंत यांनी काम पाहिले. दि १६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे निमतानदार श्रीमती आर. एन. मठकर व त्यांचे कर्मचारी तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी मनोज धुमाळे, अनंत कुबल, वन आणि कृषि विभागाचे कर्मचारी हे मुडेडोंगरी येथे नगरपंचायतीच्या स्टेडिअमकरीता आरक्षीत जमिनीची मोजणीसाठी आले होते. ही मोजणी येथील उपविभागिय अधिकारी यांच्याकडील भूसंपादन प्रस्तावानुसार प्रस्तावित होती. त्यावेळी जमिन मालकही उपस्थित होते. जमिन मालकांपैकी उमेश व सोहम बाळके यांनी जमिन मोजणीला विरोध केला. टेबल लावले तर फेकून देऊ, सोबत आणलेला म...

सिंधुदुर्ग today

इमेज
शोध व बचाव पथकांना आपत्ती व्यवस्थापन साहित्याचे वितरण चांदा ते बांदा योजनेअंतर्गत वाटप ; अत्याधुनिक साहित्यामुळे होणार मदत आंबोली व सांगेलीतील बचाव पथकाचा सत्कार सिंधुदुर्गनगरी  (ऋषिकेश मोरजकर) : आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करणे, ज्यामध्ये तात्काळ प्रतिसादाला अत्यंत महत्व आहे. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शोध व बचाव पथकांना अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन साहित्य मिळाल्यामुळे ते अधिक प्रभावीपणे कार्य करु शकणार असल्याचे 'सिंधुरत्न' योजनेचे अध्यक्ष आमदार दिपक केसरकर म्हणाले.   चांदा ते बांदा योजनेअंतर्गत आंबोली व सांगेली येथील शोध व बचाव पथकाकरिता साहित्य वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी  मच्छिंद्र सुकटे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर,  राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे प्रमुख आर.जे. यादव,  आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती सामंत तसेच आंबोली व सांगेलीतील स्थानिक बचाव पथकातील सदस्य उपस्थित होते. श्री केसरकर पुढे म्हणाले की, आंबोली परिसरातील नागरिक आपत्तीच्या वेळी मदत...

सिंधुदुर्ग today

इमेज
कोळोशी संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू योगेश कदम यांचे निधन   नांदगाव/वार्ताहर          कोळोशी बौध्दवाडी येथील योगेश गंगाराम कदम (३८)याचे दुःखद निधन झाले.गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.कोळोशी संघाचा एक अष्टपैलू क्रिकेटपटू अशी त्यांची जिल्ह्यात ओळख होती.त्याच्या निधनाची बातमी समजताच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,आई, वडील,भाऊ, बहिण असा परिवार आहे.उद्या सकाळी १०:०० वाजता अंत्ययात्रा कोळोशी येथील राहत्या घराकडून निघणार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
संघर्षा शिवाय यश नसते -  प्रा. संजीवनी पाटील  नांदगाव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ आयोजित गुणवंतांचा गौरव. गेली ४० वर्ष सातत्याने होत आहे, गुणवंतांचा गौरव. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  यशवंताची कौतुक करणारी ही  एकमेव संस्था असून कोणतेही यश पाठिंब्याशिवाय शक्य नसते. यशाची वाट सोपी नसते. संघर्ष करून आनंद मिळतो तो आनंद वेगळा असतो यश नेहमीच हवे असेल तर संघर्ष हा करावाच लागतो कारण संघर्षा शिवाय यश नसते.कासवाला मर्यादा माहिती होती. आपल्या यशाची वाट आपणच करावी लागते.असल्याचे मत प्रा. संजीवनी पाटील यांनी नांदगाव येथे व्यक्त केले. श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगाव, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था नांदगाव सरस्वती हायस्कूल नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.      यावेळी नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे चेअरमन नागेश मोरये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रा. संजीवनी पाटील ,अभिनेते गणेश रेवडेकर, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे सरपंच चंद्र...

सिंधुदुर्ग today

इमेज
उदय जाधव लिखित पुस्तकाचे अभिनेत्री चिन्मयी सुमित, कवी अजय कांडर यांच्या उपस्थितीत प्रकाशन मुंबई रविंद्र नाट्य मंदिर येथे २९ रोजी प्रकाशन सोहळा कणकवली/प्रतिनिधी      कोकण सुपुत्र तथा मराठी नाट्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक उदय जाधव लिखित ' गार्गी आणि इतर एकांकिका' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार 29 जून रोजी रात्री आठ वाजता मुंबई प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे अकादमी रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मय सुमित यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी आणि नाटककार अजय कांडर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.       उदय जाधव हे मराठी रंगभूमीवरील लक्षवेधी तरुण दिग्दर्शकांपैकी एक महत्त्वाचं नाव असून त्यांचे ' देवानंप्रिय असोक' हे आपल्या मूळ परंपरेचा शोध घेणारे वेगळे नाटक बहुचर्चित ठरले आहे.सम्राट अशोकाच्या विषयावर, अभिव्यक्ती आणि कलात्मक स्वातंत्र्याचा गैरफायदा न घेता. इतिहासाशी प्रतारणा न करता तो वास्तववादी रंगभूमीवर नाटकं रूपाने मांडणं. हे एक मोठे आव्हान होते  हे आव्हान उदय ज...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रभात फेरी. जीवनाला हो म्हणा, अंमली पदार्थांना नाही म्हणा.  कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगावात आज जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त केंद्र शाळा नांदगाव नं. १ येथे प्रभात फेरी काढण्यात आली व प्रतिज्ञा घेण्यात आली.      जीवनाला हो म्हणा अंमली पदार्थांना नाही म्हणा,नको अंमली पदार्थांची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा आदी घोषणा देण्यात आल्या.         यावेळी कणकवली पोलीस उपनिरीक्षक श्री शेडगे , नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये ,माजी पंचायत समिती सदस्या सौ. हर्षदा वाळके, ग्रामपंचायत अधिकारी आर.डी. सावंत, कासार्डे बिट अंमलदार चंद्रकांत झोरे, स्वप्निल जाधव , नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर , अनिकेत तांबे, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, केंद्रशाळा नांदगाव नं. १. मुख्याध्यापक सुहास सावंत, देसाई सर, पंचश्री मोरजकर, सौ.पोकळे,सौ.वळंजू ,सौ.चव्हाण आदी शिक्षक वृंद तसेच वि...

सिंधुदुर्ग today

इमेज
ना. नितेश राणेंच्या विशेष प्रयत्नांना यश. विजयदुर्ग आगरकरिता बी.एस. 6 प्रकारातील नवीन 5 एस.टी. बस गाड्या प्राप्त  सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथा मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे  यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगरकरिता बी.एस. 6 प्रकारातील नवीन 5 एसटी बस गाड्या प्राप्त झाल्या असून   श्री. नितेशजी राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विजयदुर्ग आगारामध्ये केक कापून या नवीन बस गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.              यावेळी पडेल मंडल अध्यक्ष श्री. महेश (बंड्या)नारकर , मा.सभापती श्री. रवी पाळेकर युवा मोर्चा अध्यक्ष श्री. उत्तम बिर्जे साहेब, श्री. भूषण पोकळे (पडेल सरपंच), श्री. रियाज काझी (विजयदुर्ग सरपंच), श्री.महेश बिडये, श्री. प्रसाद देवधर, श्री.निलेश मणचेकर, श्री. महेश चव्हाण, श्री. ग्रेसिस फर्नांडिस, सौ. संजना आळवे (महिला मोर्चा पडेल मंडळ,अध्यक्षा), सौ. शुभा कदम (ग्रा. पं. सदस्या), सौ. प्रतिक्षा मिठबाकर (ग्रा. पं. सदस्या), सौ. पूर्वा लोंबर (ग्रा. पं. सदस्या), श्रीम. गीता लळीत, श्री. विवेक जमाले (आगार व...

सिंधुदुर्ग today

इमेज
आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या सिंधुदुर्गातील संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते गौरव सिंधुदुर्गनगरी  (ऋषिकेश मोरजकर):  देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला आज २५ जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली.  यानिमित्त आणीबाणीत कारावास भोगलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.           जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, आरती देसाई, शारदा पोवार, संघर्षयात्री गजानन पणशीकर, नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य प्रभाकर सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवू म्हाडेश्वर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधि...

सिंधुदुर्ग today

इमेज
ना. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त नांदगावात संघर्षमय नाट्यप्रयोग "वीर बब्रुवाहन" प्रयोगाला झाली हाऊसफुल्ल गर्दी   कणकवली (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगावात महापुरुष मधली सभागृह येथे नांदगाव विभागाच्या वतीने संघर्षमय "वीर बब्रुवाहन" नाट्यप्रयोगाला हाऊसफुल्ल गर्दी झाली.       नाट्यप्रयोग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीतील नावलौकिक प्राप्त अभ्यासू कलाकारांच्या संयुक्त संचात महान पौराणिक संघर्षमय नाट्यप्रयोग "वीर बब्रुवाहन " हा सादर केला .     श्रीफळ वाढवून उद्घाटन कणकवली विधानसभा मतदारसंघांचे प्रमुख मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी भाजपचे तालुकासरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, महिला मंडळ च्या तालुकाध्यक्षा सौ. हर्षदा वाळके, हेमंत परुळेकर, हनुमंत वाळके, रविंद्र तेली , बापू फाटक, संतोष जाधव, नाना सामंत , कमलेश पाटील, संदेश मेस्त्री, संतोष पाटील, सचिन पाटील , उध्दव कांडर , पांडू मयेकर, आदी बहुसंख्येने कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नाट...

सिंधुदुर्ग today

इमेज
आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा २५ जून रोजी होणार सन्मान. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने प्रदर्शनाचे आयोजन. सिंधुदुर्गनगरी (ऋषिकेश मोरजकर) :   सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारावास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा बुधवार, २५ जून, २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता  जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.           देशात सन १९७५ ते १९७७  मध्ये लागलेल्या आणीबाणी कालावधीत लढा देताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यक्तींनी सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला आहे. या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देवून यथोचित गौरव करण्याचे शासनाने ठरविले आहे. जिल्ह्यातील या व्यक्तींचा बुधवार, २५ जून, २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता  जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे सन्मान जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्यास उपस्थित रा...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणेंना सिंधुदुर्गच्या सर्वांगिण विकासासाठी दीर्घायुष्य लाभो  असलदे ग्रामस्थांचे श्री देव रामेश्वर , पावणादेवी चरणी साकडे ; दिविजा वृध्दाश्रमात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप कणकवली : प्रतिनिधी  असलदेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त असलदे ग्रामपंचायत व असलदे रामेश्वर विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि., भाजपाच्यावतीने दिविजा वृध्दाश्रमात जीवनावश्यक वस्तु व फळ वाटप करण्यात आले. दिविजा वृध्दाश्रम संस्थेचे संदेश शेटये यांच्याकडे या जीवनावश्यक वस्तु सुपुर्द करण्यात आल्या. तसेच गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व पावणादेवी मंदिरात पालकमंत्री नितेश राणे यांना पुढील वाटचालीत यश, समृध्दी,दीर्घायुष्य लाभण्यासाठी अभिषेक झाल्यानंतर गाऱ्हाणे घालत पालकमंत्री नितेश राणेंना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी दीर्घायुष्य लाभो, असे साकडे असलदे ग्रामस्थांनी घातले. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके , उपसरपंच सचिन परब , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , भाजपा सरचिटणीस पंढरी वायंगणकर , भाजपा उपाध्यक्ष रघुनाथ लोके, सोस...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथे वॉटर एटीएम चे उद्घाटन. १ रुपयांत मिळणार १ लिटर फिल्टर थंडगार पाणी. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) नांदगाव ग्रामपंचायत च्या पंधरावा वित्त आयोग अंतर्गत नांदगाव तिठा ब्रिज खाली बांधलेल्या वॉटर एटीएम चे उद्घाटन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री शिंदे यांच्या हस्ते फित कापून तर नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. आता नांदगाव तिठा येथे प्रवाशांना १ रुपयांत १ लिटर फिल्टर थंडगार पाणी  मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.       यावेळी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर,विस्तार अधिकारी पंचायत समिती कणकवली आर. एल. शिंदे,कृषी अधिकारी श्री शशिकांत सुधाकर, भरसट तसेच कृषी विस्तार अधिकारी श्री विशाल शिंदे, श्री संजय कवटकर श्री प्रमोद ठाकूर, ग्रामपंचायत अधिकारी आर.डी सावंत, ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये, अनिकेत तांबे, संतोष बिडये, पुजा सावंत, गौरी परब, तसेच संतोष जाधव,राजू तांबे, व्यापारी संघटना प्रभारी अध्यक्ष रज्जाक बटवाले, रिक्षा संघटना अध्यक्ष विलास कांडर आदी बहुसंख्येने ग्रामस्थ रिक्षा संघटना पदाधिकारी...

सिंधुदुर्ग today

इमेज
जयंत पवार यांच्या लेखनाशी दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रामाणिक राहिले नाहीत. जयंत पवार संमेलनात संमेलनाध्यक्ष अभिनेते अनिल गवस यांचा स्पष्ट आरोप. संमेलनाला मुंबई, पुणे, गोवा रत्नागिरी, कोल्हापूर भागातून रसिकांची उपस्थिती. कणकवली/प्रतिनिधी    जयंत पवार हे नाटककार आणि लेखक म्हणून समूहाचे लेखक होते. त्यांनी व्यक्तीपेक्षा समूहाचे हित बघितले. त्यांच्या ' अधांतर ' नाटकाने स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले.मात्र याच नाटकावर प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी निर्मिती केलेला लालबाग परळ... हा सिनेमा चांगला नाही. चित्रपटाची व्यावसायिक गणिते घालून या मूळ नाटकाच्या संहितेत बदल केला गेल्यामुळे तो उत्तम चित्रपट निघू शकला नाही. यामुळे जयंत यांच्या नाट्य लेखनाशी महेश मांजरेकर प्रामाणिक राहिले नाहीत. मात्र महेश मांजरेकर यांनी मराठीतील अनेक मुलांना हिंदीत चित्रपटात काम दिलं याचा आपल्याला अभिमान आहे असे स्पष्ट प्रतिपादन जयंत पवार स्मृती संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सुप्रसिद्ध अभिनेते अनिल गवस यांनी केले.         सिंधुदुर्ग सुपुत्र विख्यात नाटककार, साहित्य अकादमी पुरस...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन वाटप.  कै.सौ. रश्मी राजेंद्र मोरजकर यांच्या स्मरणार्थ वाटले शैक्षणिक साहित्य. कणकवली / प्रतिनिधी  कै.सौ. रश्मी राजेंद्र मोरजकर यांच्या स्मरणार्थ, श्री राजेंद्र रामचंद्र मोरजकर पुरस्कृत आणि किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या सहकार्याने आज केंद्र शाळा नांदगाव नंबर १ येथील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन वाटप चा कार्यक्रम संपन्न झाला.     यावेळी कार्यक्रम अध्यक्ष  नांदगाव शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरये ,  प्रमुख पाहुणे  म्हणून नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, राजेंद्र  मोरजकर , ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मोमिना पाटणकर, मुख्याध्यापक सुहास सावंत, देसाई सर, सौ. पोकळे, सौ. चव्हाण,सौ. वळंजू आदी पालक उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बावशी येथील जीजी खडपे यांच्या घराचे शानदार उद्घाटन. माजी जि.प. सदस्य संजय देसाई यांच्या माध्यमातून घराचे बांधकाम पूर्ण. संजय देसाई यांच्या या चळवळीला सर्वांचा सलाम.  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) पालकमंत्री तथा मत्स्य उद्योग बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सोमवार दिनांक २३ जून रोजी बावशी येथील शेतकरी असलेले जीजी खडपे यांच्या नूतन घराचे उद्घाटन व चावी सुपुर्द सोहळा कणकवली विधानसभा मतदारसंघांचे प्रमुख मनोज रावराणे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.        यावेळी माजी उपसभापती प्रकाश पारकर, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा हर्षदा वाळके, शक्ती केंद्र प्रमुख व नांदगाव सरपंच भाई मोरजकर, कासार्डे सरपंच निशा नकाशे , उपसरपंच गणेश पाताडे,रज्जाक बटवाले, अण्णा खाडये ,संतोष मिराशी बुवा , बापू फाटक, संतोष जाधव, प्रदीप हरमलकर, निरज मोरये रघुनाथ लोके, परशुराम परब , विलास कांडर,  संतोष पाटील, कमलेश पाटील, आनंद नार्वेकर, बाळा खडपे आदी बहुसं...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बावशी येथील जीजी खडपे यांच्या घराचे उद्या लोकार्पण.  माजी जि.प. सदस्य संजय देसाई यांच्या माध्यमातून घराचे बांधकाम पूर्ण. कणकवली (ऋषिकेश मोरजकर) पालकमंत्री तथा मत्स्य उद्योग बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दिनांक २३ जून रोजी सकाळी ९ वाजता बावशी येथे शेतकरी असलेले जीजी खडपे यांच्या नूतन घराचे लोकार्पण सोहळा भारतीय जनता पार्टीच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.       बावशी येथील शेतकरी जिजी खडपे यांचे घर अत्यंत मोडकळीस आल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांनी पुढाकार घेऊन पंढरी वायंगणकर,भाई मोरजकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांचे सहकार्य घेत घराचे पूर्ण पणे नवीन बांधकाम केले आहे.सलग तिनं वर्ष अशा प्रकारे घरांचे काम करुन देत आहे या घराचा उद्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्व कार्यकर्ते व नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  ना.  नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे विविध  कार्यक्रमांचे आयोजन. नावलौकिक प्राप्त कलाकारांच्या संयुक्त संचात महान पौराणिक संघर्षमय नाट्यप्रयोग "वीर बब्रुवाहन" होणार सादर कणकवली (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे भरगच्च कार्यक्रम सोमवार दिनांक २३ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये वह्या वाटप करण्यात येणार आहे.       यात कासार्डे विभागाच्या वतीने नांदगावात भव्य दिव्य असा दशावतारी नाट्यप्रयोग मधली वाडी महापुरुष सभागृह येथे २३ जून रोजी सायंकाळी ठीक ७.३० वा सादर केला जाणार आहे.        नाट्यप्रयोग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीतील नावलौकिक प्राप्त अभ्यासू कलाकारांच्या संयुक्त संचात महान पौराणिक संघर्षमय नाट्यप्रयोग "वीर बब्रुवाहन " हा सादर होणार आहे. तरी सर्व रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. १० पोलीस अधिकारी, १४१ पोलीस अंमलदार यांचा सहभाग.  पोलीसांना कामकाजातून तणावमुक्त राहण्यासाठी  योगासन महत्त्वाचे - पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर.  सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर ) सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाकडून आज २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासना करणे गरजेचे आहे. योगी भारताने जगाला दिलेली देणगी आहे. निरोगी जीवनाच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळेच दशकभरापासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभरात साजरा झाला आहे.       सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषीकेश रावले,  यांचे सह सिंधुदुर्ग पोलीस दलातील १० पोलीस अधिकारी, १४१ पोलीस अंमलदार यांनी सहभाग नोंदविला. यावेळी योग शिक्षक श्री चंद्रकांत परब यांनी योग अभ्यास घेऊन पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दैनंदिन कामकाजातून तणावमुक्त राहण्याचे सोपे योगासने यांचा प्रात्...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव वाघाची वाडी रामेश्वर मंदिर जाणारा लोखंडी साकव वाहतुकीसाठी बंद - सरपंच भाई मोरजकर  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील नांदगाव वाघाची वाडी मधून रामेश्वर मंदिर जाणारा लोखंडी साकव पूर्णपणे जीर्ण होऊन नादुरुस्त झाला असून वाहतूक किंवा रहदारी करण्यास योग्य राहिलेला नसल्याने शासनाच्या आदेशानुसार नांदगाव ग्रामपंचायत मार्फत सदर साकव वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे फलक लावण्यात आले आहे.       तरी सदर साकवा वरून जाता येता कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शासन  आदेशानुसार सदर साकव वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीमध्ये कोणीही या साकवावरून ये जा करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.       सदर बाबत प्रस्ताव सादर केला असून शासन स्तरावर मंजुरी मिळण्यासाठी पालकमंत्री तथा मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश जी राणेंच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे सरपंच भाई मोरजकर यांनी सांगितले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
अभिनेते अनिल गवस यांची उद्या मालवण येथे प्रकट मुलाखत. कणकवली/प्रतिनिधी      मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते अनिल गवस यांची प्रकट मुलाखत रविवार 22 जून रोजी स. १० वा.  बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.        समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जून रोजी सेवांगणच्या सभागृहात ज्येष्ठ लेखक जयंत पवार स्मृती संमेलन अभिनेते अनिल गवस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात अभिनेते गवस यांची सदर प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.     अभिनेते गवस मूळचे दोडामार्ग मधील असून मराठीतील आजचे नाटक, चित्रपट आणि मालिका यामधील आघाडीचे अभिनेते म्हणून ओळखले जातात. संभाजी मालिकेतील त्यांची हंबीरराव ही भूमिका खूप गाजली आहे. तसेच जयंत पवार लिखित अधांतर या गाजलेल्या नाटकातील त्यांची ' राणे गिरणी कामगार ' ही भूमिकाही फार लक्षवेधी ठरली होती. हौशी रंगभूमीवर त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर व्यावसायिक नाटके, चित्रपट आणि मालिका यामध्ये गेली ...

सिंधुदुर्ग today

इमेज
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेत,पण आपण त्या दूर करू शकत नाही, असा एकही ज्येष्ठ नागरिक राहणार नाही. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी व्यक्त केला विश्वास. कणकवली पोलीस ठाणे येथे ज्येष्ठ नागरिक मेळावा उत्साहात संपन्न. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  मला अतिशय आनंद आहे की, एप्रिल महिन्यामध्ये याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा पहिला मेळावा उत्स्फूर्तपणे झाला होता याला चांगला प्रतिसाद तुम्ही दिला होता आणि या एप्रिल महिन्यात लावलेले छोटेसे रोपटे त्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होऊन आता त्याला फांद्या फुटत आहे. ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन उपक्रम हा दिवसेंदिवस वाढत असून ही हेल्पलाइन 24 तास सेवा देत आहे . आजपर्यंत 70 ते 80 हेल्पलाइनला ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क साधला होता आणि त्यांचे निराकरण करण्यात आल्याचे समाधान असून ज्येष्ठ नागरिक समस्या आहेत पण ती सुटली नाही असा एकही ज्येष्ठ नागरिक राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात बोलताना दिले.     कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस मह...

सिंधुदुर्ग today

इमेज
दिविजा वृद्धाश्रमार्फत मोफत मोबाईल दंत चिकित्सक फिरता दवाखाना असलदे , कळसुली, नांदगाव येथे शिबिर तळेरे, दि. 18 : (निकेत पावसकर) असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून दिविजा वृद्धाश्रम असलदे, ग्रामपंचायत कळसुली व नांदगाव उर्दू शाळा येथे दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 150 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.  दिविजा वृद्धाश्रम कोकणातील ग्रामीण भागातील खेड्यात विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असते. समाजातील गोर-गरीब जनतेसाठी सामाजिक कार्य करणारी कोकणातील एकमेव संस्था आहे. दिविजा वृद्धाश्रमार्फत शालेय मुलांसाठी विविध कार्यक्रम राबविले जातात. सामाजिक उपक्रमा बरोबरच ग्रामीण भागातील गोर-गरीब जनतेसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यातील एक उपक्रम म्हणजे मोबाईल डेंटल व्हॅन दिविजा वृद्धाश्रम व मुंबई चे डॉ.किसन गारगोटे व त्यांचा पुत्र डॉ कृतेश गारगोटे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील ग्रामीण भागातील गोर-गरीब जनतेसाठी दंत चिकित्साचे आयोजन केले जाते. त्यामध्ये दाताची किड साफ करणे, दाताचे फिलिंग करणे,दात काढणे,रूट कॅनल,कवळी बसवणे असे उपचार गोर-गरीब जनतेसाठी मोफत के...

सिंधुदुर्ग today

इमेज
कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक गुरुवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर सिंधुदुर्गनगरी दि १८ (प्रतिनिधी) :-   कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे  हे गुरुवार दि.१९ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यातील गुन्हे आढावा, कायदा व सुव्यवस्थेचा ते आढावा घेणार असून दुपारी १२ ते २ पर्यंत अभ्यागतांना भेटणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन चे तथा सह पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी सचिन हुंदळेकर  यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रस्त्यावरील खड्डयात  वृक्षारोपण करण्याच्या इशाऱ्याने संबंधित विभागाने आज खड्डे बुजविले. रिक्षा संघटनेचे शनिवार चे वृक्षारोपण रद्द. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोड वर बरेच खड्डे पडले होते. छोटे ,मोठे अपघात घडत होते. या अनुषंगाने संबंधित विभागाला जाग येण्यासाठी सन्मित्र रिक्षा संघटनेने शनिवारी खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत आज सकाळपासूनच संबंधित विभागाने तात्पुरत्या स्वरूपात सिमेंट व बारीक खडी ने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
ॲट्रॉसिटी आणि पोस्को गुन्ह्यातील संशयीतेला अटकपूर्व जामीन मंजूर. ॲड. उमेश सावंत यांनी पाहिले काम  कणकवली /प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील एका गावातील अनुसूचित जातीच्या  अल्पवयीन पीडित युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले प्रकरणी आरोपीची आई सौ गायत्री तुकाराम खोचरे हिला सत्र न्यायाधीश क्रमांक 1 श्री जे. पी. झपाटे यांनी रक्कम रुपये 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्याचा सशर्थ अटकपूर्व जामीन  मंजूर केला. संशयीतेच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.  सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून पीडित अल्पवयीन मुलीला विविध ठिकाणी फिरायला नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीवरून दीप उर्फ गोटया  तुकाराम खोचरे याचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64, 64(2),74,75,351(2) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,68,12 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3(1)( डब्ल्यू ),3(1)( आर),3(2)( व्ही आणि व्ही ए ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी आरोपी दीप याचे सह त्याची आई सौ गायत्री ह...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथील सर्विस रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास २१ जून रोजी वृक्षारोपण  नांदगाव सन्मित्र रिक्षा संघटनेचा इशारा  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा हा महत्त्वाचा टप्पा आहे. याच नांदगाव तिठ्यावरुन बरीच वाहतूक होत असते देवगड निपाणी राज्य महामार्ग मध्य भागातून गेलेला आहे. अशातच गेले काही महिने हायवे सर्विस रस्त्याला खड्डेच खड्डे पडले असून याचा फटका वाहनधारक विशेषता दुचाकीस्वार यांना बसत आहे. कित्येक दुचाकीस्वार पडून जखमी होत आहे. तरी येत्या दोन दिवसांत संबंधित विभागाने कार्यवाही न केल्यास शनिवार दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ठीक १० वा. याच खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचा इशारा नांदगाव सन्मित्र रिक्षा संघटनेने दिला आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला पुल आणि साकवांच्या सद्यस्थितीचा आढावा. जिल्ह्यातील धोकादायक साकव  - पुल नागरिकांच्या वापरासाठी तात्काळ बंद करण्याचे निर्देश.   सिंधुदुर्गनगरी दि 16 (ऋषिकेश मोरजकर) पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुल आणि साकवांच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीव्दारे घेतला. जिल्ह्यातील धोकादायक साकव तसेच पुल नागरिकांच्या वापरासाठी तात्काळ बंद करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी साकवांच्या शेजारी साकव नादुरुस्त असल्याचा फलक लावा जेणेकरुन दुर्घटना होणार नाही. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी गांभीर्यपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी नवीन पुल बांधण्यात आलेला आहे अशा ठिकाणचे साकव वापरासाठी पुर्णपणे बंद करा असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. राष्ट्रीय महामार्गाबाबत निर्देश देताना ते म्हणाले, पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांची तात्काळ दुरूस्ती करा. रस्ते दुरुस्तीचे काम दर्जेदार झाले पाहिजे जेणेकरुन...

सिंधुदुर्ग today

इमेज
'युगानुयुगे तूच 'नाटकातील करुणा फार प्रभावी - प्रेमानंद गज्वी अजय कांडर लिखित नाटकातील चर्चेत मान्यवर रंगकर्मींचा सहभाग कणकवली/प्रतिनिधी      मानवी कल्याणाचा विचार ज्या कलाकृतीतून व्यक्त होतो ती कलाकृती श्रेष्ठ असते. समता, करूणा आणि वैचारिक मंथन हे कलाकृतीचे बलस्थान असते. कवी अजय कांडर यांच्या युगानुयुगे तूच या कवितेवर मीही लेखन केले होते.आता त्याच कवितेवरील अभिनेता सचिन वळंजू अभिनित, रघुनाथ कदम दिग्दर्शित नाटक पाहताना त्यातील करुणा प्रभावीपणे व्यक्त झाली असून हे या नाटकाचे खरे यश आहे असे प्रतिपादन विख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले.     मुंबई कांचन आर्ट निर्मित सचिन वळंजू अभिनित, रघुनाथ कदम दिग्दर्शित युगानुयुगे तूच नाटकाचा मुंबईतील पहिला प्रयोग प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात अनेक मान्यवर रसिकांच्या मोठ्या प्रतिसादात सादर झाला. नाटकानंतर झालेल्या चर्चेत श्री गज्वी यांनी युगानुयुगे तूच नाटक दीर्घकाळ रंगमंचावर सादर होत राहील असा विश्वासही व्यक्त केला.यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले, ज्येष्ठ समीक्षक मीना गोखले, ज्येष्ठ अभिने...

सिंधुदुर्ग today

इमेज
  नांदगाव हायवेवर सापडलेली बॅग मालक डॉ. प्रमोद आपटे यांना सुपुर्द. नांदगाव सरपंच भाई मोरजकर, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांची समाधानकारक कामगिरी  देवगड येथील आपटे कुटुंबियांनी मानले दोघांचेही आभार. कणकवली प्रतिनिधी  गोव्याहून देवगड येथे प्रवास करणारे डॉ. प्रमोद आपटे यांनी आपली बॅग  बस मधून उतरले त्या नांदगाव तिठा हायवे ब्रिज वरील सर्व्हिस रोड लगत विसरून देवगड ला रवाना झाले मात्र ही बाब काही तासातच लक्षात येताच याबाबत लगत असलेल्या कुणकेरकर यांनी नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांना याबाबत माहिती दिली असता नांदगाव सरपंच भाई मोरजकर, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, ऋषिकेश मोरजकर यांनी त्या ठिकाणी जात आधार कार्ड वरील मोबाईल वर संपर्क साधून त्यांच्या ताब्यात सदर  बँग देण्यात आली.       याबाबत अधिक माहिती अशी की, पणजी गोवा येथून डॉ. आपटे हे बस ने प्रवास करत असताना नांदगाव तिठा येथे बस थांबणार नसल्याने ते कोळंबा मंदिर समोरील ब्रिज वर उतरले व  त्यांना न्यायला देवगड हुन कार घेऊन मुलगा येत असल्याने ते सर्व्हिस रोड वरील डिवायडर लगत बॅग ठेवत थांबले. न...

सिंधुदुर्ग today

इमेज
विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करावी : डॉ. माणिक दिवे  कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा कणकवली ः (ऋषिकेश मोरजकर) पत्रकारांच्या पाल्यांनी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन करून स्वत:च्या कुटुंबाचे नाव रोशन केले आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. पत्रकार पाल्यांनी यापुढील शैक्षणिक प्रवासात यशात सात्यय ठेवून आपण जीवनात जे ध्येय ठेवले आहे, त्याच्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.माणिक दिवे यांनी केले. कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा पंचायत समितीच्या प. पू. भालचंद्र सभागृहात आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. दिवे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, मराठी राज्य पत्रकार संघाचे परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, गामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्री. घेवडे, कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा...

सिंधुदुर्ग today

इमेज
  ज्येष्ठ लेखक जयंत पवार स्मृती संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते अनिल गवस  २२ जून रोजी मालवण येथे समाज साहित्य प्रतिष्ठान, बॅ. नाथ पै सेवांगणचे आयोजन व्याख्यान,मुलाखत,ग्रंथ प्रकाशन कविसंमेलन आदी कार्यक्रमाचे आयोजन कणकवली/प्रतिनिधी    सिंधुदुर्ग सुपुत्र मराठीतील साहित्य अकादमी विजेते ज्येष्ठ कथाकार, नाटककार,नाट्य समीक्षक जयंत पवार स्मृती संमेलन समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जून रोजी स. १० वा.मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते - नाट्यदिग्दर्शक अनिल गवस यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर,कार्यवाह सुरेश बिले, बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष पद्मनाभ शिरोडकर यांनी दिली.       सिंधुदुर्ग सुपुत्र जयंत पवार हे मराठीतील अग्रगण्य कथालेखक नाटककार आणि नाट्यसमीक्षक. त्यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या बहुचर्चित कथासंग्रहाला साहित्य अकादमी हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. अ...

सिंधुदुर्ग today

इमेज
शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुरीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पत्र वितरीत.  अपघाती मृत्यू झालेल्या तीन शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना मिळणार आर्थिक मदत. कणकवली / प्रतिनिधी   गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दुर्दैवी घटनेत बळीराजाचा मृत्यू झाल्यास त्याच्या  कुटुंबाला नियमानुसार मदत दिली जाते. या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंजुरी पत्रे धाडण्यात आली. यात शिवडाव येथील कृष्णा राजाराम करंगुटकर या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांना  मदत देणारे पत्र वितरीत करण्यात आले.शेर्पे येथील तुषार शेलार यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याने तसेच करंजे येथील मंगेश बोभाटे यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसास  मंजुरी पत्र देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांत अधिकारी जगदीश कातकर, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, संतोष कानडे, मनोज रावराणे आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
  पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर   सिंधुदुर्गनगरी दिनांक ११ (प्रतिनिधी) :-   राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री  तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. १२ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार १२ जून २०२५ रोजी दुपारी ३.२० वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. सायं. ४ वाजता भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी सरकार स्थापनेस ११ वर्षे पूर्ण झाल्याने सेवा व सुशासनाबद्दल पत्रकार परिषदेस उपस्थिती. (स्थळ :- प्रहार भवन, कणकवली). सायं. ५ वाजता तळेरे, वैभववाडी, गगनबावडा रस्त्यासंदर्भात बैठक (स्थळ:- शासकीय विश्रामगृह, कणकवली

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली पोलीस ठाण्यातील पी.एस.आय. मुंढे यांची पालघरला बदली. कणकवली पोलीस ठाण्यातून दिला निरोप. कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) श्री राजकुमार भानुदास मुंढे यांची पालघरला विनंती बदली झाली आहे. आज त्यांना कणकवली पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.        यावेळी कणकवली प्रभारी पोलीस निरीक्षक श्री मारुती जगताप तसेच कणकवली पोलीस ठाण्यातील सर्व अधिकार व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
आयुष्मान वय वंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ७० वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांना  उत्पन्न न विचारता मिळणार लाभ  सिंधुदुर्गनगरी, दि.११ (ऋषिकेश मोरजकर): भारत सरकारने १ एप्रिल २०२५ पासून ७० वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता आयुष्मान वय वंदना योजनेंतर्गत मोफत आरोग्य कव्हरेज प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी जिल्ह्यातील ७० वर्ष व  त्यावरील नागरीकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या निर्णयानुसार वेळोवेळी इतर लाभार्थी कुटूंबांचा समावेश करण्यात येऊन त्यांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत विनामुल्य वैद्यकीय लाभ प्रदान करण्यात येत आहे. आयुष्मान वय वंदना कार्ड निर्माण (ई-केवायसी) करण्याची प्रक्रिया:- आधार कार्डद्वारे लाभार्थ्यांची ई-केवायसी केली जाते. BIS 2.0 प्रणालीमधील आयुष्मान वयवंदना या टॅबमध्ये जाऊन लाभार्थ्यांच्या आधार का...

सिंधुदुर्ग today

इमेज
मराठी नाट्य निर्मात्यांच्या रास्त मागण्यापूर्तीसाठी प्रयत्नशील! : सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार "मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा"च्या पदाधिका ऱ्यांना दिले आश्वासन सिंधुदुर्ग (तळेरे), (निकेत पावसकर) मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या मराठी नाट्यसृष्टी पुढील समस्या दूर करणे, व्यवहार्य मागण्यांची पूर्तता करणे; हे शासन म्हणून आमचे कर्तव्य आहे. हे लक्षात ठेवून आपल्या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करीत आहोत, अशी खात्री राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार आशिष शेलार यांनी "मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा"च्या पदाधिकाऱ्यांना दिली. "मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ" ही मराठी व्यावसायिक नाट्य निर्मात्यांची नोंदणीकृत (स्थापना १९६९) संस्था आहे. या संस्थेच्या  मागण्यांवर चर्चा - निर्णयासाठी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी "पु.ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी" येथील समिती कक्षामध्ये  विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला "मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ"चे उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भं...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी डॉ.प्रफुल्ल आंबेरकर लिखित सूर्यभान काव्यसंग्रहात समाजाला भान देणारी कविता प्रभा प्रकाशन प्रकाशित सूर्यभान काव्यसंग्रहाचे ॲड.देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते प्रकाशन जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती कणकवली/प्रतिनिधी        कवी डॉ.प्रफुल्ल आंबेरकर लिखित सूर्यभान काव्यसंग्रहात समाजाला भान देणारे कविता लेखन आहे.सदर कविता एकाबाजूला समाजाच्या दुःखाची मांडणी करते तर दुसऱ्या बाजूला भवताली सुखसमृद्धी नांदो अशी ज्ञानेश्वरांच्या विश्वप्रार्थनेची आठवण करून देते. त्यामुळे कवी डॉ प्रफुल आंबेरकर यांच्या कवितेचा भविष्यकाळ उज्वल आहे असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड.देवदत्त परुळेकर यांनी केले.     कणकवली शहरातील नामवंत त्वचारोग तज्ञ कवी डॉ प्रफुल आंबेरकर यांच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सूर्यभान काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कसाल कोलते हॉस्पिटलच्या सभागृहात ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कवी लेखक ॲड. भालचंद्र सुपेकर यांनी उद्घघाटन केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी साहित्याच्या अभ्यासक ...