सिंधुदुर्ग today

 

ना. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

नावलौकिक प्राप्त कलाकारांच्या संयुक्त संचात महान पौराणिक संघर्षमय नाट्यप्रयोग "वीर बब्रुवाहन" होणार सादर

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे भरगच्च कार्यक्रम सोमवार दिनांक २३ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये वह्या वाटप करण्यात येणार आहे.

      यात कासार्डे विभागाच्या वतीने नांदगावात भव्य दिव्य असा दशावतारी नाट्यप्रयोग मधली वाडी महापुरुष सभागृह येथे २३ जून रोजी सायंकाळी ठीक ७.३० वा सादर केला जाणार आहे.

       नाट्यप्रयोग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीतील नावलौकिक प्राप्त अभ्यासू कलाकारांच्या संयुक्त संचात महान पौराणिक संघर्षमय नाट्यप्रयोग "वीर बब्रुवाहन " हा सादर होणार आहे. तरी सर्व रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today