सिंधुदुर्ग today



सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

१० पोलीस अधिकारी, १४१ पोलीस अंमलदार यांचा सहभाग. 

पोलीसांना कामकाजातून तणावमुक्त राहण्यासाठी  योगासन महत्त्वाचे - पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर. 

सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर )

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाकडून आज २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासना करणे गरजेचे आहे. योगी भारताने जगाला दिलेली देणगी आहे. निरोगी जीवनाच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळेच दशकभरापासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभरात साजरा झाला आहे.

      सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषीकेश रावले,  यांचे सह सिंधुदुर्ग पोलीस दलातील १० पोलीस अधिकारी, १४१ पोलीस अंमलदार यांनी सहभाग नोंदविला. यावेळी योग शिक्षक श्री चंद्रकांत परब यांनी योग अभ्यास घेऊन पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दैनंदिन कामकाजातून तणावमुक्त राहण्याचे सोपे योगासने यांचा प्रात्यक्षिकासह योग अभ्यास करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दररोज योगा व व्यायाम कसा महत्त्वाचा आहे आणि त्याचे माध्यमातून पोलीस अधिकारी व अंमलदार कसे तणाव मुक्त होऊ शकतात याबद्दल मार्गदर्शन केले आणि दररोज वेळ भेटेल तेव्हा योगासना करण्याबद्दल देखील मार्गदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today