सिंधुदुर्ग today
संघर्षा शिवाय यश नसते - प्रा. संजीवनी पाटील
नांदगाव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ आयोजित गुणवंतांचा गौरव.
गेली ४० वर्ष सातत्याने होत आहे, गुणवंतांचा गौरव.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
यशवंताची कौतुक करणारी ही एकमेव संस्था असून कोणतेही यश पाठिंब्याशिवाय शक्य नसते. यशाची वाट सोपी नसते. संघर्ष करून आनंद मिळतो तो आनंद वेगळा असतो यश नेहमीच हवे असेल तर संघर्ष हा करावाच लागतो कारण संघर्षा शिवाय यश नसते.कासवाला मर्यादा माहिती होती. आपल्या यशाची वाट आपणच करावी लागते.असल्याचे मत प्रा. संजीवनी पाटील यांनी नांदगाव येथे व्यक्त केले.
श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगाव, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था नांदगाव सरस्वती हायस्कूल नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे चेअरमन नागेश मोरये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रा. संजीवनी पाटील ,अभिनेते गणेश रेवडेकर, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, श्रीधर मोरये, नांदगाव विकास मंडळ अध्यक्ष गजानन रेवडेकर, अँड दिपक अंधारी, कणकवली पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, केंद्र प्रमुख सद्गुरू कुबल, शिवाजी लोके, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर,ओटव पोलीस पाटील मंगेश तांबे,पालक संघ अध्यक्ष मारुती मोरये, मनोहर खोत, रज्जाक बटवाले, मुख्याध्यापक सुधीर तांबे आदी बहुसंख्येने पालक विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
आम्ही गेली ४० वर्ष नांदगाव येथे श्री देव कोळंब उत्कर्ष सेवा मंडळाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार सोहळा अविरतपणे करत आहे आजही त्याच धर्तीवर माध्यमिक परीक्षेत सुयश संपादन केलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी यांचा गुणगौरव शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि कल्पवृक्ष देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येत आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू केले. पुढची पिढी शिकावी यासाठी माझे प्रयत्न असून तरूण मंडळींनी पुढे यावे. असे आवाहन अध्यक्षीय भाषणात नागेश मोरये यांनी करत पालक व मुलांनी मेहनत घेतल्यास प्रगतीपथावर येतील असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुधीर तांबे तर सूत्रसंचालन सावंत सर यांनी केले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा