सिंधुदुर्ग today
नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रस्त्यावरील खड्डयात वृक्षारोपण करण्याच्या इशाऱ्याने संबंधित विभागाने आज खड्डे बुजविले.
रिक्षा संघटनेचे शनिवार चे वृक्षारोपण रद्द.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोड वर बरेच खड्डे पडले होते. छोटे ,मोठे अपघात घडत होते. या अनुषंगाने संबंधित विभागाला जाग येण्यासाठी सन्मित्र रिक्षा संघटनेने शनिवारी खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत आज सकाळपासूनच संबंधित विभागाने तात्पुरत्या स्वरूपात सिमेंट व बारीक खडी ने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा