सिंधुदुर्ग today
नांदगाव वाघाची वाडी रामेश्वर मंदिर जाणारा लोखंडी साकव वाहतुकीसाठी बंद - सरपंच भाई मोरजकर
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव वाघाची वाडी मधून रामेश्वर मंदिर जाणारा लोखंडी साकव पूर्णपणे जीर्ण होऊन नादुरुस्त झाला असून वाहतूक किंवा रहदारी करण्यास योग्य राहिलेला नसल्याने शासनाच्या आदेशानुसार नांदगाव ग्रामपंचायत मार्फत सदर साकव वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे फलक लावण्यात आले आहे.
तरी सदर साकवा वरून जाता येता कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शासन आदेशानुसार सदर साकव वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीमध्ये कोणीही या साकवावरून ये जा करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर बाबत प्रस्ताव सादर केला असून शासन स्तरावर मंजुरी मिळण्यासाठी पालकमंत्री तथा मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश जी राणेंच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे सरपंच भाई मोरजकर यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा