सिंधुदुर्ग today
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बावशी येथील जीजी खडपे यांच्या घराचे शानदार उद्घाटन.
माजी जि.प. सदस्य संजय देसाई यांच्या माध्यमातून घराचे बांधकाम पूर्ण.
संजय देसाई यांच्या या चळवळीला सर्वांचा सलाम.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
पालकमंत्री तथा मत्स्य उद्योग बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सोमवार दिनांक २३ जून रोजी बावशी येथील शेतकरी असलेले जीजी खडपे यांच्या नूतन घराचे उद्घाटन व चावी सुपुर्द सोहळा कणकवली विधानसभा मतदारसंघांचे प्रमुख मनोज रावराणे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी माजी उपसभापती प्रकाश पारकर, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा हर्षदा वाळके, शक्ती केंद्र प्रमुख व नांदगाव सरपंच भाई मोरजकर, कासार्डे सरपंच निशा नकाशे , उपसरपंच गणेश पाताडे,रज्जाक बटवाले, अण्णा खाडये ,संतोष मिराशी बुवा , बापू फाटक, संतोष जाधव, प्रदीप हरमलकर, निरज मोरये रघुनाथ लोके, परशुराम परब , विलास कांडर, संतोष पाटील, कमलेश पाटील, आनंद नार्वेकर, बाळा खडपे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
बावशी येथील शेतकरी जिजी खडपे यांचे घर अत्यंत मोडकळीस आल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांनी पुढाकार घेऊन पंढरी वायंगणकर,भाई मोरजकर, विलास कांडर यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांचे सहकार्य घेत घराचे काम पूर्ण पणे नवीन बांधकाम केले आहे.सलग तिनं वर्ष अशा प्रकारे घरांचे काम करुन देत आहे या घराचे उद्घाटन व चावी सुपुर्द करणे सोहळा आयोजित करण्यात आला होता. संजय देसाई यांच्या या सलग तीन वर्षे गरीबांना घरे देण्यासाठी एक चळवळ उभी केली असल्याने या चळवळीला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. व त्यांच्या दातृत्वाचे कौतुक केले.तर खडपे दांपत्याने संजय देसाई यांचे मनोमन आभार मानून त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थ यांची प्रतिमा भेट दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा