सिंधुदुर्ग today



नांदगाव तिठा येथील सर्विस रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास २१ जून रोजी वृक्षारोपण 

नांदगाव सन्मित्र रिक्षा संघटनेचा इशारा 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा हा महत्त्वाचा टप्पा आहे. याच नांदगाव तिठ्यावरुन बरीच वाहतूक होत असते देवगड निपाणी राज्य महामार्ग मध्य भागातून गेलेला आहे. अशातच गेले काही महिने हायवे सर्विस रस्त्याला खड्डेच खड्डे पडले असून याचा फटका वाहनधारक विशेषता दुचाकीस्वार यांना बसत आहे. कित्येक दुचाकीस्वार पडून जखमी होत आहे. तरी येत्या दोन दिवसांत संबंधित विभागाने कार्यवाही न केल्यास शनिवार दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ठीक १० वा. याच खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचा इशारा नांदगाव सन्मित्र रिक्षा संघटनेने दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today