सिंधुदुर्ग today
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बावशी येथील जीजी खडपे यांच्या घराचे उद्या लोकार्पण.
माजी जि.प. सदस्य संजय देसाई यांच्या माध्यमातून घराचे बांधकाम पूर्ण.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
पालकमंत्री तथा मत्स्य उद्योग बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दिनांक २३ जून रोजी सकाळी ९ वाजता बावशी येथे शेतकरी असलेले जीजी खडपे यांच्या नूतन घराचे लोकार्पण सोहळा भारतीय जनता पार्टीच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
बावशी येथील शेतकरी जिजी खडपे यांचे घर अत्यंत मोडकळीस आल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांनी पुढाकार घेऊन पंढरी वायंगणकर,भाई मोरजकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांचे सहकार्य घेत घराचे पूर्ण पणे नवीन बांधकाम केले आहे.सलग तिनं वर्ष अशा प्रकारे घरांचे काम करुन देत आहे या घराचा उद्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्व कार्यकर्ते व नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा