पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
विद्यार्थ्यांनी  यशाचे सातत्य राखावे - भगवान लोके. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त दहावी , बारावी गुणवंतांचा सत्कार ; असलदे ग्रामपंचायत , विकास सोसायटीच्यावतीने आयोजन  कणकवली : प्रतिनिधी   विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात दहावी , बारावी हे वर्ष महत्त्वाचे असते. असलदे गावातील शैक्षणिक वाटचालीत दहावी , बारावी मध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले यश कौतुकास्पद आहे. असलदे गावाला अभिमान  वाटेल असे यश या दहावी , बारावीतील विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. नांदगाव व कोळोशी हायस्कुल मध्ये पहिल्या क्रमांकाचे यश मिळवण्याचे काम मंदार शामसुंदर हडकर ( 91.80 नांदगाव हायस्कुल ) , तेजस्विनी सुनील तांबे ( 79.80 कोळोशी हायस्कुल ) या विद्यार्थ्यांनी केला आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिवशी झालेल्या सन्मानाने प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे अहिल्याबाई होळकर यांचे विचार आणि कार्य आत्मसात करत पुढील जीवनात यशाचे सातत्य राखावे , असे आवाहन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी केले. असलदे ग्रामपंचायत , रामेश्वर विविध कार्यकारी सोसायटी यांच्या ...

सिंधुदुर्ग today

इमेज
विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर. ॲड. उमेश सावंत यांनी पाहिले  काम. कणकवली / प्रतिनिधी विवाहीतेला वारंवार अश्लिल फोन करून रात्रीच्यावेळी तीच्या खोलीवर जात अश्लिल वर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी सिद्धेश बाळू खरात, प्रमोद प्रकाश कोकरे यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामिन मंजूर केला. संशयितांच्यातीने ॲड.  उमेश सावंत यांनी काम पाहिले. एका गावातील विवाहीत महिलेला तीचा वारंवार पाठलाग करून व तीचा मोबाईल नंबर मिळवून तीला वेळी अवेळी अश्लिल फोन केले. तसेच रात्रीच्यावेळी ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत राहत्या घरी जात अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार तीघांवर भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५, ७८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत संशयितांच्यावतीने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता सुनावणीअंती प्रत्येकी ५० हजार रुपयांचा जामिन मंजूर करताना पुराव्यात ढवळाढवळ करू नये, फिर्यादीशी संपर्क साधू नये, आदी अटी घालण्यात आल्या आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
जीवनाला हो म्हणा, अंमली पदार्थांना नाही म्हणा !  नांदगाव येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम  कणकवली ३० मे (ऋषिकेश मोरजकर) जीवनाला हो म्हणा, अंमली पदार्थांना नाही म्हणा ! नको अंमली पदार्थांची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा! तुमचे मन स्वच्छ ठेवा, अंमली पदार्थांपासून मुक्त रहा ! अंमली पदार्थ सोडा, मुक्त जीवन जगा ! अशा विविध घोषणा देत नांदगाव येथे दोन दिवस अंमली पदार्थ विरोधी प्रभात फेरी काढण्यात आली.           सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या सुचनेनुसार कणकवली तालुक्यातही पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांना याबाबत सुचना देण्यात आली असून याचाच भाग म्हणून आज नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेवून प्रभात फेरी काढण्यात आली.         यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर,  तालुक...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी डॉ.अमुल पावसकर यांच्या कवितेत राजकीय पडसाद - कवी अजय कांडर 'अनुभूती' काव्यसंग्रह प्रकाशन प्रसंगी जिल्ह्यातील मान्यवर डॉक्टरांची उपस्थिती लीलावती हॉस्पिटलच्या डॉ. अनिरुद्ध फडके यांनी जागवल्या मुंबई साहित्य सहवासच्या आठवणी कणकवली/प्रतिनिधी      कवी डॉ. अमुल पावसकर यांच्या अनुभूती काव्यसंग्रहातील कवितांमधून राजकीय पडसाद उमटलेले दिसत असून या संग्रहातील कवितेला कोणताच विषय वर्ज्य नाही. प्रेमापासून निसर्गापर्यंत, सामाजिकतेपासून राजकारणापर्यंत सगळेच विषय अनुभूती मधील कवितानी व्यापलेले दिसतात. यामुळेच अनुभूती मधील कवितांमधून जगण्याचे समग्रभान व्यक्त होते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी केले.    सिंधुदुर्ग जिल्हयातील विख्यात सर्जन डॉ. अमुल पावसकर यांच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अनुभूती काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथील मराठा सभागृहात आयोजित करण्यात आला. मुंबई लीलावती हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर अनिरुद्ध फडके यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात बोलताना कवी कांडर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील व्य...

सिंधुदुर्ग today

इमेज
नागरी संरक्षण स्वयंसेवकासाठी नोंदणी करण्याचे आवाहन  सिंधुदुर्गनगरी,  (ऋषिकेश मोरजकर):- उपनियंत्रक नागरी संरक्षण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व तालुक्यामध्ये रिक्त असलेली मानसेवी सदस्य पदांची भरती करण्यासाठी स्वयंसवेक नोंदणी कार्यक्रम 2 ते 12 जून रोजी सकाळी 10 वाजता  उपनियंत्रक नागरी संरक्षण कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी तसेच जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय व प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्गनगरी (ओरोस) सिडको भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील  पुरुष, महीला प्रवर्गांनी नवीन सदस्य नोंदणीसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हा समादेश होमगार्ड तथा अपर पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले यांनी केले आहे.   स्वंयसेवक नोंदणी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे:- भारतीय नागरिक असावा. वयाची कीमान 18 वर्ष पुर्ण झालेली असावेत. किमना चौथी पास असावा. शररिक दृष्ट्या सुदृढ असावा. कोणताही गुन्हा दाखल नसावा.  लागणारे कागदपत्रे:- शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पास बुक-( बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफसी कोड, पहीले पान), वैद्यकीय प्रमाणपत्र, ...

सिंधुदुर्ग today

इमेज
पौष्टिक तृणधान्य उपअभियान (श्रीअन्न) पिक प्रात्यक्षिकासाठी  २९ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी,दि.२७ (प्रतिनिधी:- राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियानः पौष्टिक तृणधान्य उपअभियान (श्रीअन्न) पिक प्रात्यक्षिकासाठी  जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थानी mahadbt.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर २९ मेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.  राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियानः पौष्टिक तृणधान्य उपअभियान (श्रीअन्न) अंतर्गत नाचणी, वरी या पौष्टिक तृणधान्याचे क्षेत्र व उत्पादकता वाढीसाठी पिक प्रात्यक्षिके जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. पिक प्रात्यक्षिके शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इ. द्वारे राबविण्यात येणार आहे. शेतकरी गट हा ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणी केलेला असावा. शेतकरी गट कोणत्याही शासन यंत्रणेकडे नोंदणीकृत असावा (आत्मा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्...

सिंधुदुर्ग today

इमेज
कथाकार शरद काळे स्मृती पुरस्कार डॉ.मिलिंद कुलकर्णी, डॉ.ऋचा कुलकर्णी यांना प्रदान. शारदीय प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार  सोहळ्याचे आयोजन कणकवली /प्रतिनिधी     खारेपाटणच्या शारदीय प्रतिष्ठानचा प्रा.शरद काळे स्मृति पुरस्कार तळेरे येथील सेवाभावी डॉक्टर दाम्पत्य डॉ.मिलिंद कुलकर्णी व डॉ.ऋचा कुलकर्णी यांना धारखंड- वाळपई,गोवा येथे प्रदान करण्यात आला.'गोवा मराठी अकादमी'चे अध्यक्ष प्रा.अनिल सामंत यांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारताना डॉ.मिलिंद आणि डॉ.ऋचा कुलकर्णी यांनी साहित्य सेवाव्रती शरद काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची प्रेरणा कायमच पुढील काम करण्याला बळ  देईल असे सांगितले.    यावेळी गेली ३० वर्षे कोकणातील गोरगरीब लोकांसाठी एक सहृदय 'कोकणचो डॉक्टर' म्हणून सुपरिचित आलेले डॉ.मिलिंद व डॉ.ऋचा कुलकर्णीं यांना रोख रु १०,०००, मानपत्र, शाल श्रीफळ, मोरपीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी 'शारदीय प्रतिष्ठान'चे श्रीमती वर्षा काळे,चारुता काळे प्रभुदेसाई, डॉ.अनुजा जोशी, कपिल काळे उपस्थित होते.यावेळी डॉ .कुलकर्णी दांपत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. काळेसरा...

सिंधुदुर्ग today

इमेज
पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची उद्या बैठक. नुकसानीचा घेणार आढावा. जनजीवन सुरळीत करण्यासाठी उपाय योजनांवर चर्चा. संबंधित विभाग प्रमुख राहणार उपस्थित. सिंधुदुर्गनगरी दि २३ (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. ही बैठक शनिवार दि. २४ मे रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. या बैठकीला  जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, तसेच संबंधित सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
प्राचार्य शरद काळे स्मृती 'शारदीय प्रतिष्ठान पुरस्कार' डॉ.मिलिंद कुलकर्णी आणि डॉ.सौ.ऋचा कुलकर्णी यांना जाहीर कणकवली/प्रतिनिधी शिक्षण,साहित्य व संस्कृती या त्रिसूत्रीसाठी कार्य करण्या-या खारेपाटण येथील 'शारदीय प्रतिष्ठान' या संस्थेतर्फे स्व.प्राचार्य शरद काळे स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा 'शारदीय प्रतिष्ठान' पुरस्कार तळेरे डॉ.मिलिंद कुलकर्णी आणि डॉ.सौ.ऋचा कुलकर्णी या दाम्पत्याला देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानकडून देण्यात आली.      कोकणचे ज्येष्ठ कथाकार प्राचार्य शरद काळे व त्यांच्या पत्नी वर्षा काळे यांचे खारेपाटण शिक्षणसंस्थेचे व्रतस्थ दाम्पत्यकार्य सर्वांना सुपरिचित आहे. याच कार्याचा प्रेरक स्मृतिजागर म्हणून त्यांची मुले कवयित्री डाॅ.अनुजा जोशी, सौ.चारूता प्रभुदेसाई,कपिल काळे व कुटुंबियांनी स्थापन केलेल्या संस्थेतर्फे दरवर्षी एका सेवाभावी कलाप्रिय दाम्पत्याला हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा डाॅ.कुलकर्णी दाम्पत्याची यासाठी निवड होऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येत आहे रू.१०,००० मानपत्र व शारदीय स्मृतीभेट असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कारप्रदान क...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथील 'तिरंगा' रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद ! भारत माता की जय... वंदे मातरम्... जय जवान जय किसान ... घोषणांनी परिसर गेला दणाणून  कणकवली (प्रतिनिधी) भारत माता की जय... वंदे मातरम्... जय जवान जय किसान ... घोषणांनी नांदगाव तिठा परिसर दणाणून गेला.        दहशतवादाच्या विरोधात शौर्य व प्राणपणाने लढून आपल्या देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या व वेळप्रसंगी स्वतःच्या जीवाचे बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नांदगाव तिठा येथे आज   'तिरंगा' रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.       यावेळी माजी सभापती तथा भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर ,खरेदी विक्री संघाचे संचालक तथा भाजपचे तालुकासरचिटणीस पंढरी वायंगणकर , नांदगाव सरपंच रविराज मोरजकर,हर्षदा वाळके, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर,कासार्डे उपसरपंच  गणेश पातडे , युवक तालुका अध्यक्ष अण्णा खाडये, सुशील इंदप बांदिवडेकर, प्रदीप हरमलकर ,रघुनाथ लोके , रज्जाक बटवाले, संतोष परब, कमलेश पाटील श्री वाडेकर सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग प्रा...

सिंधुदुर्ग today

इमेज
चित्रकथी लोककलेचा अनुभव : सिंधुदुर्गमध्ये पारंपरिक कार्यशाळा सिंधुदुर्ग (ऋषिकेश  मोरजकर ) महाराष्ट्राच्या  समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणारी चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे १ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सकाळी १० वाजता ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे. चित्रकथी ही ठाकर आदिवासी समाजाची पारंपरिक कला असून, तिच्यात चित्रे, कथा आणि संगीत यांचे अद्वितीय संमीलन असते. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना ही जुनी व लुप्त होत चाललेली लोककला प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळणार आहे. "चित्रकथी म्हणजे आमच्या परंपरेचा आत्मा आहे. ही कला लोकांनी अनुभवावी, शिकावी आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावी, हेच आमचं ध्येय आहे," असे चेतन परशुराम गंगवणे म्हणाले. ते कार्यशाळेचे समन्वयक असून पद्मश्री परशुराम गंगवणे यांच्या वारशाचे जतन करणाऱ्या कुटुंबातील सदस्य आहेत. केवळ ₹१०० प्रवेश शुल्कात ही कार्यशाळा कोणालाही खुली असून, विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील जिज्ञासूंना सहभागी होता येईल. नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:📞 चेतन परश...

सिंधुदुर्ग today

इमेज
पत्रकार संजय परब यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा उत्कृष्ट क्रीडा पत्रकारिता पुरस्कार विख्यात हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या हस्ते परब यांचा गौरव पुरस्काराची रक्कम कोकण जनविकास समितीला कणकवली/प्रतिनिधी    सिंधुदुर्ग (वेंगुर्ले ) सुपुत्र ज्येष्ठ पत्रकार संजय परब यांना मुंबई पत्रकार संघाचा प्रतिष्ठेचा उत्कृष्ट क्रीडा पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला असून मुंबई येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात संजय परब यांना भारताचे विख्यात हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्या हस्ते सदर पुरस्काराने गौरविण्यात आले.         मुंबई पत्रकार संघाच्या क्रीडा पुरस्कार समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया कबड्डीपटू विजू पेणकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, संघाचे कार्यवाह व पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के, पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर,विश्वस्त देवदास मटाले,सुरेश वडवलकर,प्रा.हेमंत सामंत, दिवाकर शेजवळ, आदी पदाधिकारी उपस्थित हो...

सिंधुदुर्ग today

इमेज
दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या वीर जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी नांदगाव तिठा येथे उद्या 'तिरंगा' रॅलीचे आयोजन! नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) दहशतवादाच्या विरोधात शौर्य व प्राणपणाने लढून आपल्या देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या व वेळप्रसंगी स्वतःच्या जीवाचे बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नांदगाव तिठा येथे उद्या शुक्रवार दिनांक २३ मे २०२५ रोजी सकाळी ९.३० वा.'तिरंगा' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.      तरी विद्यार्थी, शेतकरी, व्यावसाईक, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यापारी ,रिक्षा चालक ,मॅजिक चालक, दशक्रोशीतील सर्व ग्रामस्थ ई. सह सर्व देशप्रेमी नागरिकांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
झी सिने अवॉर्ड्स 2026 सिंधुदुर्गात..!  पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांना यश सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर) – सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून झी सिने अवॉर्ड्सचा २४ वा भव्य सोहळा यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे. झी व्यवस्थापनाकडून नुकतीच ही अधिकृत घोषणा करण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयामुळे सिंधुदुर्गचे पर्यटन क्षेत्र आणखी वेगाने विकसित होण्यास चालना मिळणार आहे. या घोषणेदरम्यान स्क्रीनवर मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच सिंधुदुर्गातील अनेक सुंदर पर्यटन स्थळांचे दर्शन घडवण्यात आले. उपस्थितांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. २३ व्या झी सिने अवॉर्ड्स कार्यक्रमालाही नामदार नितेश राणे उपस्थित होते, तेव्हापासूनच त्यांनी सिंधुदुर्गात हा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. ही बातमी समजताच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण पसरले असून, ‘हा कार्यक्रम नेमका कोठे व कधी होणार?’ याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. स्थानिक नागरिक व पर्यटन व्यवसायिकांच्या मते, सिंधुदुर्गात...

सिंधुदुर्ग today

इमेज
योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान केला पाहिजे : जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर  भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डेच्यावतीने संयुक्त जयंती उत्सव साजरा सिंधुदुर्ग (तळेरे), दि. प्रतिनिधी  योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान आणि गौरव केला पाहिजे. शिवाय, केलेले उपकार न विसरता त्यांच्याविषयी कृतज्ञ असले पाहिजे. त्याच जाणिवेने भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डे कदमवाडीचे काम विजय कदम आणि सहकाऱ्यांच्या सहकाऱ्याने सुरू आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी केले. ते कासार्डे कदमवाडी येथील भारतीय बौद्ध महाभेने आयोजित केलेल्या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात बोलत होते.  यावेळी कासार्डे माजी सरपंच संतोष पारकर, शाखा अध्यक्ष विजय कदम, ग्रामपंचायत सदस्य विजय राणे, संदेश पत्र संग्राहक, पत्रकार निकेत पावसकर, ड्रामा ज्युनिअर फायनलिस्ट सावी मुद्राळे, प्रा. विनायक पाताडे, शाखा उपाध्यक्ष बबन तांबे, गोपाळ पांचाळ, समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव गुणाजी जाधव, संतोष कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते भिकाजी कदम, पोलिस पाटील योगेश कदम, वैभव मुद्राळे आदी मान्यवर उपस्थित होते.  कासार...

सिंधुदुर्ग today

इमेज
आगामी तीन महिन्याचे धान्य 30 जूनपर्यंत उचल करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी,(ऋषिकेश मोरजकर):   अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार आगामी पावसाळा, पूर परिस्थिती इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता लाभार्थ्यांनी वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी माहे जून, जुलै व ऑगस्ट 2025 चे अन्नधान्याची आगाऊ उचल व वाटप करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे निर्देश आहेत. तरी पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे धान्य दि. 30 जून 2025 पर्यंत संबंधित रास्त भाव धान्य दुकानदारांकडून उचल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी  विजय सहारे यांनी केले आहे. धान्याची आगाऊ उचल करताना लाभार्थ्यांनी ईपॉस मशीन वर तीन वेळा अंगठा (Thumb) लावून माहे जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांचे धान्य मिळाल्याची खात्री करावी. लाभार्थ्यांनी लवकरात लवकर धान्य उचल करुन शासनाच्या धोरणात्मक घेतलेल्या निर्णयाची अंमलबलावणी कामात सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे. 

सिंधुदुर्ग today

इमेज
‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात नितेश राणे यांची मुलाखत           सिंधुदुर्गनगरी दि 17 (ऋषिकेश मोरजकर) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.           ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि. 20, बुधवार दि. 21, गुरूवार दि. 22, शुक्रवार दि. 23 आणि शनिवार दि. 24 मे 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत दोन भागात प्रसारण होणार असून या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 20 मे 2025 रोजी तसेच दुसऱ्या भागाचे मंगळवार दि. 27 मे 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण होणार आहे. निवेदक निलेश पवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.  मुलाखतीच्या पहिल्या भागात अवैध मोसमारीच्या नियंत्रणासाठी ड्रोनच्या माध्यमातून सुरक्षा, मत्स्यव्यवसायाला...

सिंधुदुर्ग today

इमेज
पत्रकार ,लोकप्रतिनिधी त्यांच्यातील सकारात्मक संवादातून महाराष्ट्र सर्वांगीण विकासात पुढे जाईल. मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास. आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभेत मंत्री नितेश राणे यांनी मांडले विचार. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ यांच्या वतीने झाली अभिवादन सभा. पत्रकारांचे प्रश्न सरकारकडे सकारात्मक दृष्टीने मांडणार सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी. पत्रकार समाजाचा आरसा आहे. महाराष्ट्र राज्याला विकासाच्या योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी पत्रकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात योग्य संवाद,तुम्हा सर्व पत्रकारांची सकारात्मक साथ निर्माण करून   चालणे ही आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आणि तसेच सकारात्मक काम महाराष्ट्रात होईल असा विश्वास मस्त व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. अनेक लोकप्रतिनिधी हे पत्रकारांच्या योगदानामुळेच  घडलेले आहेत. समाजाच्या जडणघडणेत पत्रकाराचा फार मोठा वाटा आहे.असेही ते म्हणाले...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या 'जपलाला कनवटीचा' काव्यसंग्रहाचे १८ रोजी प्रकाशन डॉ.नंदकुमार मोरे, प्रवीण बांदेकर, अजय कांडर, डॉ. शरयू आसोलकर, डॉ.गोविंद काजरेकर, ॲड. संदीप निंबाळकर,मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती  कणकवली/प्रतिनिधी     मालवणी बोलीतील प्रसिद्ध कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या प्रभा प्रकाशन कणकवली यांनी प्रकाशित केलेल्या 'जपलाला कनवटीचा' काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार 18 मे रोजी सायं. ५ वा. शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख तथा नामवंत बोली भाषा अभ्यासक डॉ.नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. श्रीराम वाचन मंदिर आणि प्रभा प्रकाशनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत कादंबरीकार - कवी प्रवीण बांदेकर, सुप्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर, नामवंत कवयित्री, मालवणी बोलीभाषा अभ्यास डॉ. शरयू आसोलकर, नामवंत समीक्षक कवी प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर, श्रीराम वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंड...

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी डॉ. अमुल पावसकर यांच्या  'अनुभूती ' काव्यसंग्रहाचे १७ रोजी कुडाळ येथे प्रकाशन कवी अजय कांडर अध्यक्ष तर डॉ.अनिरुद्ध फडके प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित कणकवली/प्रतिनिधी        सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक कवी डॉ.अमुल महादेव पावसकर यांच्या प्रभा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ' अनुभूती ' काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार १७ मे रोजी सायं ४ वा. मराठा समाज मंडळ सभागृह कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नामवंत कवी तथा भारत सरकार साहित्य अकादमीचे (मराठी) माजी सदस्य अजय कांडर तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई लिलावती हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर अनिरुद्ध यशवंत फडके यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. कादंबरी अमुल पावसकर यांनी दिली.     कवी डॉ.अमुल महादेव पावसकर यांची सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक म्हणून ख्याती आहे.मात्र कवी म्हणूनही ते गेली अनेक वर्ष निष्ठेने काव्य लेखन करत असतात. कवितेबरोबर चित्रकलेची आवड असणाऱ्या डॉ. अमुल पावसकर यांचे यापूर्वी काही काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. कवी डॉ.अमूल पा...

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे ओझरम कॉजवे दशक्रोशीला जोडणार – दिलीप तळेकर  असलदे येथे कॉजवेच्या कामाचे भूमिपूजन  कणकवली :  पियाळी नदीवरील  असलदे बौध्दवाडी , दिवानसानेवाडी ते ओझरम जाणा-या रस्त्यावर कॉजवे बांधणे या कामासाठी ९३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी पालकमंत्री नितेश राणे , खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या कॉजवेवरुन ये - जा करण्यासाठी नागरिकांना सोयीचे होणार आहे. या नदीवरील कॉजवे ( साकव ) दशक्रोशीतील गावांना जोडणार असल्याचा विश्वास भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांनी दिला आहे.  असलदे दिवानसानेवाडी येथे पियाळी नदीवरील  असलदे बौध्दवाडी , दिवानसानेवाडी ते ओझरम जाणा-या रस्त्यावर कॉजवे बांधणे या कामाचा श्रीफळ वाढवून भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके ,  उपसरपंच सचिन परब , ग्रा.पं.सदस्य आनंद तांबे , सोसायटी संचालक उदय परब , परशुराम परब , शत्रुघ्न डामरे ,सुरेश मेस्त्री , सतिश पांचाळ , महेश लोके , मधुसुदन परब , दीपेश परब , आत्माराम घाडी , बाबू जांभळे , बाबल पांचाळ आदींसह गावातील ग्राम...

सिंधुदुर्ग today

इमेज
ओम गणेश मित्र मंडळ नांदगाव वाशिनवाडी आयोजित श्री सत्यनारायण महापूजे निमित्त उद्या विविध कार्यक्रम. सायं ६ वा. महिला दिंडी भजन  नांदगाव /प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील ओम गणेश मित्र मंडळ नांदगाव वाशिनवाडी आयोजित दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही उद्या मंगळवार दिनांक १३ मे २०२५ रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.       यानिमित्ताने कार्यक्रम सकाळी ९.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती व तिर्थ प्रसाद , दुपारी १ ते ३ महाप्रसाद , दुपारी ३ ते ५ महिलांसाठी हळदीकुंकू, समारंभ, ४ ते ५ स्थानिक भजन, सायंकाळी ६ ते ८ श्री रवळनाथ प्रासादिक महिला दिंडी भजन मंडळ पडवे यांचे दिंडी भजन होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील श्री. देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सवाला भक्तांचा जनसागर लोटला  हजारो भाविकांची दर्शनासाठी झाली गर्दी  बाबा देवा कोळंब्या महाराजा... होय महाराजा... कणकवली (ऋषिकेश मोरजकर) बाबा देवा कोळंब्या महाराजा... हात भेटेचो नारळ आणि तुझ्या चाळ्याक भक्ष दिला आहे... तो पावन करून घे आणि सर्वांना सुखी ठेव रे महाराजा... होय महाराजा... अशा प्रकारे  कोळंबा देवाला साकडे घालत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथे जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सव आज रविवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.       या जत्रोत्सवाला आज सकाळपासून मागील नवसाची फेड करण्यासाठी भाविकांची तोबा गर्दी पहायला मिळत आहे. जत्रोत्सवासाठी मोठा सभामंडप उभारण्यात आला असून महीला व पुरुष भक्तांना दोन स्वतंत्र रांगा दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तसेच विविध दुकाने थाटली असल्याने या जत्रोत्सवाला मोठे स्वरूप प्राप्त झाले होते. त्याच प्रमाणे विद्युत रोषणाईने नांदगाव कोळंबा परिसर उजळून निघाला आहे. या जत्रोत्सवासाठी मटण भाकरीचा महाप्रसाद दिला जातो . एवढ्या मोठ्या प्रमाणात भाकरी लागत असल्य...

सिंधुदुर्ग today

इमेज
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी मयूर कासलेची निर्दोष मुक्तता आरोपीच्या वतीने ॲड. प्राजक्ता शिंदे, ॲड.कौस्तुभ मर्गज यांनी काम पाहिले   कणकवली/प्रतिनिधी      अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर अत्याचार  केलेप्रकरणी मयूर सखाराम कासले (शिरवल-कणकवली) याची मे.विशेष सत्र न्यायाधीश ओरोस श्रीम.व्ही.एस.देशमुख यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ॲड. प्राजक्ता शिंदे, ॲड.कौस्तुभ मर्गज यांनी काम पाहिले.        याबाबतची सविस्तर हकीकत अशी की २९ एप्रिल २३ रोजी पिडीत अल्पवयीन मुलगी ही तिचे कॉलेजला जाण्याकरिता नेहमीप्रमाणे घरातून निघून गेली. त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी ही नेहमीच्या वेळेत घरी परत न आल्याने तिचे नातेवाईक यांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आलेली नाही. त्यामुळे तिचे अज्ञानाचा फायदा घेवून तिला कोणीतरी अज्ञात इसमाने कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले  अशी फिर्यादी पोलिस स्टेशन मध्ये देण्यात आली. त्यानुसार कणकवली पोलीस स्टेशन गुन्हा भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर  ३० एप्रिल २३...

सिंधुदुर्ग today

इमेज
चांदा ते बांदा योजना अंतर्गत दुर्लक्षित फळ पिके व मसाला पिके लागवड  कृषि विभागातर्फे मागविण्यात आले अर्ज  कणकवली प्रतिनिधी  चांदा ते बांदा योजना अंतर्गत दुर्लक्षित फळ पिके व मसाला पिके लागवडीकरिता कृषी विभागामार्फत अर्ज मागविण्यात येत असून यामध्ये दुर्लक्षित फळ पिके कोकम रोपे, फणस, जांभूळ ,करवंद,मसाला पिके काळीमिरी आणि जायफळ पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी अर्ज करण्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी तळेरे श्री अर्जुन जाधव यांनी केले .लाभार्थी पात्रता निकष सर्व शेतकरी लाभार्थी एमआरजीएस व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मागील तीन वर्षात लाभ घेतलेला नसावा क्षेत्र मर्यादा पाच गुंठे ते दोन हेक्टर पर्यंत अनुदान मर्यादा  रोपे खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान  बाकी इतर इतरबाबींकरिता सर्व खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करावयाचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 मे 2025 , संपर्क  गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवलीत प्रेस क्लबसाठी प्रस्ताव द्या – पालकमंत्री नितेश राणे  पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके व नुतन कार्यकारिणीचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केला सत्कार  कणकवली : प्रतिनिधी  कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके व नुतन कार्यकारिणीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. पत्रकार संघ म्हणून आगामी काळात चांगले काम करा , अशा शुभेच्छा व्यक्त केल्या . तसेच कणकवली पत्रकार संघाने प्रेस क्लबसाठी प्रस्ताव दिल्यास ते काम मार्गी लावले जाईल , असा विश्वास या भेटीदरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.   यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी गणेश जेठे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ , सचिव संजय सावंत , खजिनदार रोशन तांबे , माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई , अजित सावंत ,  उपाध्यक्ष उमेश बुचडे , विरेंद्र चिंदरकर , तुषार हजारे , संजय बाणे , विजय गांवकर आदींसह पत्रकार उपस्थित होते. 

सिंधुदुर्ग today

इमेज
  नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री. देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सव रविवारी. जत्रोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात. कणकवली (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या नांदगाव येथे जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. रविवार दिनांक  ११ मे २०२५ रोजी कोळंबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव होणार आहे.         रविवार दिनांक ११ मे रोजी होणाऱ्या श्री देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सव निमित्ताने कार्यक्रम सकाळी ८ ते ९ पूजाविधी, सकाळी ९ ते २ नवस फेड करणे , दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे, सायंकाळी ४ ते ८ महाप्रसाद अशा प्रकारे जत्रोत्सव असणार आहे.  मंडप चे काम दिवस रात्र सुरू . जत्रोत्सवाला अवघे दोन दिवस बाकी उरले असल्याने सभामंडपाचे काम जोरदार सुरू आहे. दिवस रात्र मंडप चे काम केले जात आहे. मंदिर परिसरात स्वच्छता करुन शेणाने सारवण्यात आले आहे. जत्रोत्सवात मटण भाकरीचा प्रसाद ;भाकरी पिठाचे नियोजन. या जत्रोत्सवाचे विशेष म्हणजे येथे येणाऱ्या भाविकांना दर्शन घेतल्या...

सिंधुदुर्ग today

इमेज
  जिल्ह्यात विविध ठिकाणी मॉक ड्रिल संपन्न           सिंधुदुर्गनगरी दि. ०७ (ऋषिकेश मोरजकर ) :  केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले होते.  त्याच अनुषंगाने युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने दक्षता म्हणून आज जिल्हा भरात विविध ठिकाणी एकाच वेळी मॉक ड्रील घेण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्यादृष्टीने सादर करण्यात आलेले विविध प्रात्यक्षिके देखील सर्वांनाच उपयोगी पडणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मॉक ड्रिलच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवि पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती शारदा पोवार, श्रीमती आरती देसाई, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श...

सिंधुदुर्ग today

इमेज
सावित्री सावंत प्रतिष्ठानच्या वतीने वृध्दाश्रमात धान्य व खाऊ वाटप कणकवली प्रतिनिधी  दिवीजा वृध्दाश्रम असलदे येथे नुकतेच सावित्री सावंत प्रतिष्ठानच्या वतीने धान्य व खाऊ वाटप करण्यात आले.याबाबत दिवीजा वृध्दाश्रमच्या वतीने प्रमुख संदेशजी शेटये यांनी समाधान व्यक्त केले.       सावित्री सावंत प्रतिष्ठानची स्थापना मुख्य संस्थापक विश्वस्त सुधाकर सावंत यांनी केल्यानंतर मुंबई व ग्रामीण भागात  विविध सामाजिक, शैक्षणिक,क्रिडा, आरोग्य यासाठी लहान मोठे उपक्रम राबवून मदत कार्य व सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. मंगळवारी असलदे येथील दिवीजा वृध्दाश्रमाला भेट देऊन धान्य व खाऊ वाटप केले.यावेळी संस्थापक विश्वस्त सुधाकर सावंत, विश्वस्त उत्तम सावंत, वृध्दाश्रम असलदेचे संस्थापक संचालक संदेश शेटये,पल्लवी सावंत, अनिल इंदप,संजय इंदप, समीर मिठबावकर,काव्या सावंत, आदी सावंत,वृध्दाश्रम असलदेचे सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.तर या उपक्रमात कमलाकर बिडवाडकर यांचेही मोलाचे योगदान लाभले.     यावेळी बोलताना सावित्री सावंत प्रतिष्ठानचे संस्थापक मुख्य विश्वस्त सुधाकर सावंत म्हणाले की,आपण आपले जी...

सिंधुदुर्ग today

इमेज
विविध मागण्यांकरिता राज्यस्तरीय कृषी सहाय्यक संघटनेचे धरणे आंदोलन कणकवली प्रतिनिधी   महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना मार्फत विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय आंदोलन सुरू आहे यावेळी दिनांक ७ मे २०२५ रोजी कणकवली तालुका कृषी सहायक संघटने मार्फत धरणे आंदोलन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या बाहेर करण्यात आले आहे. प्रमुख मागण्या  कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी, डिजिटल कामकाजासाठी कृषी सहाय्यक यांना लॅपटॉप देण्यात यावा, ग्राम स्तरावर मदतीसाठी कृषी  मदतनिसांची नेमणूक करावी ,कृषी निविष्ठा वाटपात वाहन भाड्याची तरतूद करावी किंवा परमिट द्वारे वाटप करावे ,कृषी विभागाच्या आकृतीबंधास तात्काळ मंजुरी देऊन कृषी सहायकांच्या पदोन्नती मधील अडथळा दूर करावा ह्या प्रमुख मागण्या आहेत  आंदोलनाचे टप्पे ५ मे – काळया किती लावून कामकाज , ६ मे –सर्व शासकीय ग्रुप मधून बाहेर पडणे ,७ मे– सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयं समोर कृषी सहायक धरणे आंदोलन करतील ,८ मे– कृषी सहाय्यक एक दिवस सामूह...

सिंधुदुर्ग today

इमेज
अभिनेता सचिन वळंजू युगानुयुगे तूच नाटक खूप पुढे घेऊन जाईल अजय कांडर लिखित - रघुनाथ कदम दिग्दर्शित 'युगानुयुगे तूच' नाटकाच्या चर्चेत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.राजेद्र चव्हाण यांचा विश्वास देवगड येथील पहिल्याच प्रयोगाला रसिकांचा प्रतिसाद कणकवली/प्रतिनिधी       कवी अजय कांडर लिखित युगानुयुगे तूच हा नाट्य दीर्घांक कांडर यांच्या कळत्या न कळत्या वयात या नाटकाचा पुढचा भाग आहे.अभिनेता सचिन वळंजू हे हा दीर्घांक अतिशय प्रभावीपणे सादर करतात. या नाट्य दीर्घांकाचे दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी अतिशय परिश्रमपूर्वक हे नाटक रंगमंचावर आणले आहे. सचिन यांनी ते सादर करताना या नाटकाच्या संधीच सोनं केलं असून युगानुयुगे तूच हे नाटक अभिनेता सचिन वळंजू खूप पुढे घेऊन जाईल असा विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.राजेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. .      डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे हा विचार केंद्रस्थानी ठेवून कवी अजय कांडर यांनी युगानुयुगे तूच ही दीर्घ कविता लिहिली. त्याचे नाटक मुंबई दूरदर्शनने यापूर्वी प्रसारित केले होते. त्यानंतर मुंबई कांचन आर्टतर्फे ते आता पुन्हा रंगमंचावर सादर करण्यात येत अस...

सिंधुदुर्ग today

इमेज
राज्यातील १६ ठिकाणांमध्ये सिंधुदुर्गचाही समावेश जिल्हाभरात होणार मॉक ड्रिल ; संपुर्ण जिल्ह्यात दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल रात्री ८ वाजता देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात ब्लॅक आऊट अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन       सिंधुदुर्गनगरी, दि.०६ (ऋषिकेश मोरजकर ) :  जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 16  ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवार दि. 7 मे रोजी मॉक ड्रिल्स केले जाणार आहे.  या 16 ठिकाणांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये उद्या दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल तर रात्री 8 वाजता ब्लॅक आऊट करण्यात येणार आहे. यावेळी आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्रथोमोपचार या बाबी सज्ज असणे आवश्यक आहे.  यामध्ये  आपदा मित्र आणि नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक यांचा समावेश असणार आहे . या कालावधीत नागरिकांनी अफवांवर विश्...

सिंधुदुर्ग today

इमेज
वरेरी राणे वाडी येथे महोत्सव निमित्त एकपात्री अभिनय, नृत्य व संगीत चक्री भजन स्पर्धा देवगड प्रतिनिधी        देवगड तालुक्यातील वरेरी येथील राणेवाडी विकास मंडळ, मुंबई/ग्रामस्थ ,वरेरी श्री सत्यनारायण महापूजे निमित्त दिनांक ९ व १० मे २०२५ असे दोन दिवस राणे वाडी महोत्सव आयोजित करून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय‌ स्पर्धा,खुली एकेरी नृत्य स्पर्धा तालुकास्तरीय संगीत चक्री भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.         राणेवाडी विकास मंडळ मुंबई/ग्रामस्थ,वरेरी (या.देवगड) यांच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक ९ मे २०२५ रोजी जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा यामधील प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रक्कम ३३३३ व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक २२२२ व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक ११११ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.तर जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा दोन गटात घेण्यात येईल.यामध्ये १२ वर्षांखालील व १२ वर्षाच्या वरील असे दोन गट असतील.यामधील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ३३३३,२२२२,११११ प्रथम द्...

सिंधुदुर्ग today

इमेज
फोंडाघाट येथे तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन कार्यक्रम कार्यशाळा उत्साहात संपन्न. कणकवली प्रतिनिधी  फोंडाघाट येथील भात संशोधन केंद्र येथे आज तालुका स्तरीय खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.          यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषि विद्यावेत्ता डॉ. एन. ए. शेटये यांनी भात पिकाच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांना कृषि सहाय्यकां मार्फत नवीन फळबागेमधील CRA तंत्रज्ञान प्रात्यक्षिक, भात पिकाची चटई रोपवाटीका प्रात्यक्षिक, बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक, जिवामृत तयार करणेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी मंडळ कृषि अधिकारी, तळेरे यांनी कृषि विभागाच्या सर्व योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी श्री. प्रशांत धुरी यांनी यांत्रिकीकरणाद्वारे भात पिक लागवडी विषयी माहिती दिली व आपले अनुभव व्यक्त केले.  सदर कार्यक्रमास मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी मा. श्री. पाटील साहेब तसेच मा. श्री. आळते साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर मा. तालुका कृषि अधिकारी, कणकवली श्रीम. मुळे मॅडम...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा ब्रिज खाली झालेल्या भिषण अपघातातील सेवानिवृत्त कंट्रोलर ऊमर  नावलेकर यांचे निधन  दोन महिन्यांपूर्वी झाला होता अपघात. कणकवली | प्रतिनिधी   कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा ओव्हर ब्रिज खाली ९ मार्च रोजी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास ट्रक व दुचाकी या दोन वाहनांमध्ये झालेल्या भिषण अपघातातील गंभीर जखमी झालेल्या सेवानिवृत्त कंट्रोलर ऊमर नावलेकर यांचे काल सायंकाळी उशिरा निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. दोन महिन्यांपूर्वी नांदगाव तिठा ब्रिज खाली अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीस्वार उमर इमाम नावलेकर यांचा एक पाय जाग्यावरच पूर्णत: तुटला होता . गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन अधिक उपचारासाठी बांबूळी येथे हलविण्यात आले होते. दोन महिन्यांपासून बांबुळी येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोल्हापूर येथे अधिक उपचारासाठी दाखल करावयाचे असल्याने कालच त्यांचा डिस्चार्ज मागून घरी नांदगाव येथे आणले होते. मात्र घरी आणल्यानंतर त्यांचे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. एस टी महामंडळात त्यांनी वाहक म्हणून नोकरी बजावताना...