सिंधुदुर्ग today



चांदा ते बांदा योजना अंतर्गत दुर्लक्षित फळ पिके व मसाला पिके लागवड 

कृषि विभागातर्फे मागविण्यात आले अर्ज 

कणकवली प्रतिनिधी 

चांदा ते बांदा योजना अंतर्गत दुर्लक्षित फळ पिके व मसाला पिके लागवडीकरिता कृषी विभागामार्फत अर्ज मागविण्यात येत असून यामध्ये दुर्लक्षित फळ पिके कोकम रोपे, फणस, जांभूळ ,करवंद,मसाला पिके काळीमिरी आणि जायफळ पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी अर्ज करण्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी तळेरे श्री अर्जुन जाधव यांनी केले .लाभार्थी पात्रता निकष सर्व शेतकरी लाभार्थी एमआरजीएस व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मागील तीन वर्षात लाभ घेतलेला नसावा क्षेत्र मर्यादा पाच गुंठे ते दोन हेक्टर पर्यंत अनुदान मर्यादा

 रोपे खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान  बाकी इतर इतरबाबींकरिता सर्व खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करावयाचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 मे 2025 , संपर्क

 गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today