सिंधुदुर्ग today
सावित्री सावंत प्रतिष्ठानच्या वतीने वृध्दाश्रमात धान्य व खाऊ वाटप
कणकवली प्रतिनिधी
दिवीजा वृध्दाश्रम असलदे येथे नुकतेच सावित्री सावंत प्रतिष्ठानच्या वतीने धान्य व खाऊ वाटप करण्यात आले.याबाबत दिवीजा वृध्दाश्रमच्या वतीने प्रमुख संदेशजी शेटये यांनी समाधान व्यक्त केले.
सावित्री सावंत प्रतिष्ठानची स्थापना मुख्य संस्थापक विश्वस्त सुधाकर सावंत यांनी केल्यानंतर मुंबई व ग्रामीण भागात विविध सामाजिक, शैक्षणिक,क्रिडा, आरोग्य यासाठी लहान मोठे उपक्रम राबवून मदत कार्य व सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. मंगळवारी असलदे येथील दिवीजा वृध्दाश्रमाला भेट देऊन धान्य व खाऊ वाटप केले.यावेळी संस्थापक विश्वस्त सुधाकर सावंत, विश्वस्त उत्तम सावंत, वृध्दाश्रम असलदेचे संस्थापक संचालक संदेश शेटये,पल्लवी सावंत, अनिल इंदप,संजय इंदप, समीर मिठबावकर,काव्या सावंत, आदी सावंत,वृध्दाश्रम असलदेचे सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.तर या उपक्रमात कमलाकर बिडवाडकर यांचेही मोलाचे योगदान लाभले.
यावेळी बोलताना सावित्री सावंत प्रतिष्ठानचे संस्थापक मुख्य विश्वस्त सुधाकर सावंत म्हणाले की,आपण आपले जीवन जगत असताना आपण समाजाचेही देणं लागतो.एकमेकांना मदत,दान, धर्म ही आमच्या आईने दिलेली शिकवण आहे.हा वारसो आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत यासाठी सर्व आजी आजोबांच्या आशिर्वादाची गरज आहे.आणि हि आमची सुरवात आहे.तर संदेश शेटये म्हणाले की,आपण आपल्या आईच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करून गरजवंताला फुल ना फुलाची पाकळी देऊन जी सुरवात केली आहे.ती पुढेही अधिक वाढत जावो आमचेही आपल्याला सहकार्य मिळत राहील.यावेळी वृध्दाश्रम मधील प्रमुख संदेशजी शेटये व सर्व सहका-यानी मोठे सहकार्य करून हि छोट्याश्या भेटीचा स्विकार करत धन्यवाद दिले.तर सन्मानचिन्ह देऊन सुधाकर सावंत, उत्तम सावंत देऊन प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा