सिंधुदुर्ग today



फोंडाघाट येथे तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन कार्यक्रम कार्यशाळा उत्साहात संपन्न.

कणकवली प्रतिनिधी 

फोंडाघाट येथील भात संशोधन केंद्र येथे आज तालुका स्तरीय खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

         यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषि विद्यावेत्ता डॉ. एन. ए. शेटये यांनी भात पिकाच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांना कृषि सहाय्यकां मार्फत नवीन फळबागेमधील CRA तंत्रज्ञान प्रात्यक्षिक, भात पिकाची चटई रोपवाटीका प्रात्यक्षिक, बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक, जिवामृत तयार करणेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी मंडळ कृषि अधिकारी, तळेरे यांनी कृषि विभागाच्या सर्व योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी श्री. प्रशांत धुरी यांनी यांत्रिकीकरणाद्वारे भात पिक लागवडी विषयी माहिती दिली व आपले अनुभव व्यक्त केले.  सदर कार्यक्रमास मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी मा. श्री. पाटील साहेब तसेच मा. श्री. आळते साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर मा. तालुका कृषि अधिकारी, कणकवली श्रीम. मुळे मॅडम उपस्थित होते. तालुक्यातील सर्व कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक उपस्थित होते. आत्मा विभागाचे ATMश्री. पाटील उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today